चंद्रपूर, 13 मे : अनधिकृत संकेतस्थळांमुळे चंद्रपूरच्या (chandrapur) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (Tadoba Sanctuary) प्रवेश नोंदणी संदर्भात पर्यटकांची फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत व्याघ्रप्रकल्पाच्या अधिकृत संकेतस्थळा व्यतिरिक्त अन्य कुठल्याही संकेतस्थळावरून (website) प्रवेश नोंदणी करू नये असे क्षेत्र संचालकांनी आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसात अनधिकृत असलेल्या काही संकेतस्थळावरून प्रवेश नोंदणी झाल्यावर प्रत्यक्ष प्रवेश निश्चित न झाल्याने पर्यटकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या यावर प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.
पर्यटकांकडून अनधिकृत संकेतस्थळांच्या माध्यमातून पैसे ही कट झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तर ज्यांनी बुकिंग केले आहे त्यांचे पैसेही परत मिळाले नसल्याने पर्यटकांनी तक्रारी केल्या आहेत. दरम्यान ताडोबा अभयारण्यासंदर्भात पर्यटकांमध्ये संभ्रम पसरल्याचे समजतात प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे.
हे ही वाचा : Sanjeevani Karandikar: बाळासाहेब ठाकरे यांची बहीण संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने निधन
हा सगळा प्रकार लक्षात येताच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने यासंदर्भात पोलीसांकडे रीतसर तक्रार दिली आहे. फसवणूक झालेल्या पर्यटकांनाही संबंधित पोलिस ठाण्यामध्ये रीतसर तक्रार नोंदविण्याचे आवाहन केले आहे. मागची दोन वर्ष www.mytadoba.org हे संकेत स्थळ उत्तम रित्या ताडोबा प्रवेश नोंदणी काम करत आहे. यापुढच्या काळात ताडोबा शब्दाचा अन्य कुणीही वापर करू नये यासाठी न्यायालयाकडून आदेश प्राप्त करणार असल्याची अधिकार्यांनी माहिती दिली.
ताडोबा विषयी माहिती…
ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान असून ते चंद्रपूर जिल्हयात आहे. याची स्थापना १९५५ साली झाली व महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. उद्यानात आढळणाऱ्या मगरी-सुसरी आणि गवा हे इथले मुख्य वैशिष्ट्य आहे. काही काळापूर्वी या उद्यानाचे व अंधारी अभयारण्याचे संयुक्तीकरण होऊन त्याचे नाव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प झाले आहे व राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रही वाढवण्यात आले आहे. अभयारण्याचे क्षेत्रफळ ११६ चौ.कि.मी. इतके आहे आणि इथले जंगल ५०९ चौ.कि.मी. एवढे आहे.
अंधारी नदीला ताडोबाची जीवनवाहिनी अर्थातच लाईफ लाईन ऑफ ताडोबा असे म्हटले जाते. खातोडा गेट जवळील नाला म्हणजे या नदीचे जन्मस्थान आहे. ही नदी मोहर्ली, कोळसा, मूल मार्गे अभयारण्याच्या बाहेर पडते. या नदीमुळे ताडोबातील वाघ व अन्य वन्यप्राण्यांना नवसंजीवनी मिळाली असून ही नदीच या प्रकल्पातील पाणवठ्याचे मुख्य उगमस्थान आहे. अंधारी नदीच्या प्रवाहात वाघडोह, मोहाचा खड्डा, कळंबाचा डोह, उमरीचा पाटा, तुलाराम हे पाणवठे आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrapur, Tiger in chandrapur, Tigers, चंद्रपूर chandrapur