चंद्रपूर, 9 सप्टेंबर : चंद्रपूरात (Chandrapur News) 25 वर्षीय तरुणाने 20 वर्षांच्या तरुणीवर चाकूहल्ला केल्याचं वृत्त समोर आलं आहे. रक्तबंबाळ अवस्थेत मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथले डॉक्टर्स उपचारासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत. ही घटना शहरातील महाकाली मंदिर मार्गावर झाली. या मार्गावरील दुकान ओळीत असलेल्या लगतच्या एका दुकानातील CCTV कॅमे-यात घटनेनंतर पळताना आरोपी कैद झाला आहे. (The girl was stabbed and the accused was caught fleeing on CCTV )
या प्रकरणातील युवक-युवती एकमेकांना परिचित असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हल्ल्यानंतर पोलिसांनी काही वेळात आरोपीला ताब्यात घेतलं. घटनेमागे असलेल्या कारणांचा शोध घेत शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. स्वतः पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी शहर पोलिस ठाण्यात पोचून घटनेचा आढावा घेतला. ऐन सणासुदीच्या काळात गजबजलेल्या भागात झालेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा-पुणे पुन्हा हादरलं! स्टेशन परिसरात फूटपाथवर झोपलेल्या 6 वर्षांच्या चिमुरडीवर रेप
अद्याप हल्लेमागील कारण समोर आलेलं नाही. तरी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. भररस्त्यात अगदी गजबजलेल्या भागात हा हल्ला झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chandrapur, Crime news