Home /News /nagpur /

कोरोना संकटात नागरिकांची लूट; उपचाराच्या नावाखाली लाटले 3.50 लाख, उपचाराविना रुग्णाचा मृत्यू

कोरोना संकटात नागरिकांची लूट; उपचाराच्या नावाखाली लाटले 3.50 लाख, उपचाराविना रुग्णाचा मृत्यू

कोरोना संकटात नागपूरात सर्वसामान्यांची लूट सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.

नागपूर, 5 मे: कोरोनाच्या संकटात (Corona crises) नागरिकांची लूट असल्याच्या घटना सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. नागपूर (Nagpur)मध्ये कोरोना उपचाराच्या नावावर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. कोविड बेडच्या (bed for covid patients) टंचाईचा गैर फायदा उचलत काही लोक आमच्याकडे बेड उपलब्ध असल्याचे सांगून कोविड रुग्णांना त्यांच्या घरून घेऊन जातात आणि कोविड सेंटरमध्ये (Covid center) दाखल करतात. त्यांनतर तुमच्या रुग्णावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगून नातेवाईकांकडून पैसे वसूल करतात असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या जरीपटका भागात राहणाऱ्या गणपती नारनवरे यांना त्यांच्या घरून बर्डीच्या एका हॉटेलमध्ये उपचारासाठी ठेवले. त्यानंतर या भामट्यांनी नातेवाईकांकडून उपचाराच्या नावावर साडेतीन लाख वसूल केले. मात्र रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे बघून नातेवाईकांना संशय आला. त्यांनतर डॉक्टरला घरी बोलावून परिसरातील जागरूक नागरिकांनी या प्रकारचा व्हिडीओ काढला. कोरोना लस घेतल्यानंतर किती दिवसांनी Blood donate करू शकता? सरकारने केला मोठा बदल कोविड रुग्णाची फसवणूक करण्याचा हा व्हिडीओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आहे. विशेष म्हणजे ज्या गणपती नारनवरे या रुग्णाकडून या भामट्यांनी पैसे उकळले त्यांचा नंतर उपचाराविना मृत्यू झाला. जेव्हा नातेवाईक या संपूर्ण प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे द्यायला गेले तेव्हा जरीपटका पोलिसांनी याची तक्रार घेतली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी पालिकेत धाव घेत आयुक्तांकडे ही तक्रार केली आहे. पोलिसांकडून किंवा महानगरपालिकेकडून याबाबत कुठलाही खुलासा आलेला नाहीये. तो आल्यावर बातमी अपडेट होईल. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या या संकटात नागरिकांची लूट थांबणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांना लुबाडणारे रॅकेट सक्रिय झाल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. नागपूरमध्ये तर या रुग्णावर उपचारच झाले नाहीत आणि अखेर त्या रुग्णाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Coronavirus, Nagpur

पुढील बातम्या