Home /News /lifestyle /

कोरोना लस घेतल्यानंतर किती दिवसांनी Blood doante करू शकता? सरकारने केला मोठा बदल

कोरोना लस घेतल्यानंतर किती दिवसांनी Blood doante करू शकता? सरकारने केला मोठा बदल

कोरोना लस घेतल्यानंतर रक्तदान करण्यासंबंधी (Blood donation after corona vaccination) नवीन गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत.

    मुंबई, 05 मे : सध्या 18+ व्यक्तींचं कोरोना लसीकरण (Corona vaccination) सुरू झालेलं आहे. त्यामुळे रक्तदान (Blood donation) करणाऱ्या बहुतेक व्यक्ती कोरोना लस (Blood donation after corona vaccination) घेणार आहेत. कोरोना काळात आधीच रक्ताचा तुटवडा आहे. त्यात आता रक्तदान करू शकणाऱ्या व्यक्ती कोरोना लस घेणार त्यामुळे त्यांना काही दिवस रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे हा तुटवडा अधिक वाढण्याची शक्यता आहे आणि हेच लक्षात घेत आता सरकारने कोरोना लस घेतल्यानंतर रक्तदान करण्यासंबंधी नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. सुरुवातीला कोरोना लस घेतल्यानंतर 28 दिवसांनी रक्तदान करावं, असं सल्ला सरकारने दिला होता. पण आता त्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. नॅशनल ब्लड ट्रान्सफ्युजन काऊन्सिलने (National Blood Transfusion Council) नवं परिपत्रक जारी केलं आहे. त्यात कोरोना लस घेतल्यानंतर रक्तदान करण्याचा कालावधी बदलण्यात आला आहे. NBTC च्या या परिपत्रकानुसार कोरोना लस घेतल्यानंतर 28 नाही तर 14 दिवसांनी तुम्ही रक्तदान करू शकता. रक्ताचा तुडवडा लक्षात घेता सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. हे वाचा - ...तर कोरोना निदानासाठी RT-PCR TEST करू नका; ICMR च्या नव्या गाइडलाइन्स NBTC  चे अतिरिक्त महासंचालक डॉ. सुनील गुप्ता यांनी या परिपत्रकात सांगितलं, मार्चमध्ये आम्ही कोरोना लसीकरणानंतर रक्तदान करण्याचा कालावधी 28 दिवस ठेवला होता. पण आता रक्तदान करणाऱ्या बहुतेक वयाच्या व्यक्ती कोरोना लस घेणार आहेत. त्यामुळे आता तज्ज्ञांशी चर्चा करून हा कालावधी कमी करण्यात आला आहे. कोणत्याही कोरोना लशीचा प्रत्येकी डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी रक्तदान करता येणार आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Blood donation, Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या