जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / उल्हासनगर RT-PCR स्वॅब स्टिक पॅकिंग प्रकरण; अखेर ठेकेदार मनीष केशवानीला अटक

उल्हासनगर RT-PCR स्वॅब स्टिक पॅकिंग प्रकरण; अखेर ठेकेदार मनीष केशवानीला अटक

उल्हासनगर RT-PCR स्वॅब स्टिक पॅकिंग प्रकरण; अखेर ठेकेदार मनीष केशवानीला अटक

Ulhasnagar Swab Stick packing case: उल्हासनगर येथे घराघरात स्वॅब स्टिक पॅकिंग करायला देणाऱ्या ठेकेदाराला अटक करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

उल्हासनगर, 7 मे: कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी (Covid19 RTPCR test) करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वॅब स्टिक्सचं अक्षरश: घराघरात पॅकिंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार न्यूज 18 लोकमत (News18 Lokmat) ने उघडकीस आणला होता. या प्रकरणात आता उल्हासनगर पोलिसांनी (Ulhasnagar Police) कारवाई करत ठेकेदार मनीष केशवानी याला अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी न्यूज 18 लोकमतने हा सर्व प्रकार उघडकीस आणला होता त्यानंतर उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली होती. त्यानंतर आता या सर्व कामाचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराला अटक करण्यात आली आहे. आरटीपीसीआर चाचणी ही खूपच महत्वाची मानली जाते कारण या चाचणीचा अहवाल योग्य असल्याचं मानलं जातं आणि त्यामुळेच आरटीपीसीआर चाचण्या मोठ्या प्रमाणात केल्या जातात. मात्र, या चाचणीसाठी आवश्यक असलेल्या स्वॅब स्टिक्सचं पॅकिंग चक्क घराघरात होत असल्याचा प्रकार उल्हासनगर येथे समोर आला. वाचा: कोरोनाच्या Rtpcr स्वॅब स्टिकची असुरक्षिपणे घराघरात पॅकिंग उल्हासनगरमध्ये कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीसाठी वापरण्यात येणाऱ्या स्वॅब स्टिकचं पॅकिंग असुरक्षितपणे आणि कुठलीही काळजी न घेता पॅकिंग होत असल्याचं समोर आलं. उल्हासनगरातील कॅम्प 2 च्या खेमानी संत ज्ञानेश्वर नगर परिसरात घरोघरी महिला, लहान मुले या स्वॅब स्टिकचं पॅकिंग करत असल्याचं उघडकीस आलं. या स्वॅब स्टिक चक्क जमिनीवर ठेवून त्यांची प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये पॅकिंग करण्यात येत होती. हे सर्व काम देणाऱ्या ठेकेदार मनीष केशवानी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ठेकेदार मनीष केशवानी याला न्यायालयात हजर केले असता 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात