नागपूर, 6 ऑक्टोबर : नागपूर जिल्हा परिषदमध्ये (Nagpur Zilla Parishad) पुन्हा एकदा काँग्रेसने (Congress) आपली सत्ता कायम ठेवली आहे. आज लागलेल्या जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूक निकालांमध्ये काँग्रेसने दोन जागा वाढवत आपली सत्ता आणखी मजबूत केली आहे. या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकूण 16 उमेदवार अपात्र ठरवण्यात आले होते. काँग्रेसचे 7, शेकापचा 1, भाजपचे 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 असे एकूण 16 उमेदवार पात्र झाले होते. आज लागलेल्या निकालात 16 पैकी काँग्रेसने 9 जागेवर यश मिळवलं आपली सत्ता आणखी मजबूत केली. त्यामुळे भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) जागा कमी झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपला फक्त तीन जागेवर निवडणूक जिंकता आली. त्यांनी या निवडणुकीत एकूण 16 उमेदवार रिंगणात उतरवले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत सर्वात जास्त फटका बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त दोन जागांवर विजय मिळवता आल्या आहेत. अनिल देशमुख मतदार संघापासून दूर असल्याने त्यांना याचा फटका बसला. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसला याच मतदारसंघात चार उमेदवार होते. नरखेड जिल्हा परिषद - सावरगाव - पार्वता काळबांडे, भाजप विजयी काटोल जिल्हा परिषद - पारडसिंगा - मीनाक्षी सरोदे,भाजप विजयी, जिल्हा परिषद - येनुवा - समीर उमप, शेकाप विजयी नागपूर जिल्हा परिषद - गोधणी रेल्वे - कुंदा राऊत, काँग्रेस विजयी हिंगणा जिल्हा परिषद - निलडोह - संजय जगताप, काँग्रेस विजयी जिल्हा परिषद - इसासानी - अर्चना गिरी भाजप विजयी जिल्हा परिषद - डिगडोह - रश्मी कोटगुले राष्ट्रवादी विजयी सावनेर जिल्हा परिषद - वाकोडी - ज्योती सिरसकर काँग्रेस विजयी जिल्हा परिषद - केळवद - सुमित्रा कुंभारे काँग्रेस विजयी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा झटका, नरखेड पंचायत समितीवर भाजपचं वर्चस्व मौदा जिल्हा परिषद - अरोली - योगेश देशमुख काँग्रेस विजयी कामठी जिल्हा परिषद - गुमथाळा -दिनेश ढोले काँग्रेस विजयी जिल्हा परिषद - वडोदा -अवंतिका लेकुरवाळे काँग्रेस विजयी रामटेक जिल्हा परिषद - बोथलीया/पालोता- हरीश उईके गोंडवाना गणतंत्र विजयी कुही जिल्हा परिषद - राजोना - अरुण हटवार काँग्रेस विजयी पारशिवनी जिल्हा परिषद - कऱ्हांभांड - अर्चना भोयर काँग्रेस विजयी जिल्हा परिषद निवडणूक निकाल भाजप - 3 जागांवर विजय (आधी 4) शिवसेना - 0 ( आधी 0) काँग्रेस - 9 जागांवर विजय(आधी 7) राष्ट्रवादी - 2 जागांवर विजय (आधी 4) शेकाप - 1 जागा विजयी (आधी 1) गोंडवाना गणतंत्र - 1 जागा विजयी( आधी 0) पंचायत समिती निवडणूक निकाल दुसरीकडे पंचायत समिती निकालांमध्ये देखील काँग्रेसने मुसंडी मारली. पंचायत समितीमध्ये काँग्रेसने 21 जागा मिळवत निर्विवाद यश मिळवलं तर भाजपच्या देखील दोन जागा वाढल्या त्यांना एकूण सहा जागेवर पंचायत समितीमध्ये निवडणूक जिंकता आल्या. तर दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला पंचायत समितीमध्ये देखील गोड निराशेचा सामना करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागांचा फटका बसत त्या वेळेस फक्त दोन जागा जिंकता आल्या. तर शिवसेनेला ना जिल्हा परिषदमध्ये खाते उघडता आलं ना पंचायत समितीमध्ये खाते उघडता आलं. या निवडणुकीत मात्र गोंडवाना गणतंत्र पक्षाने जिल्हा परिषदमध्ये एक जागा जिंकत सर्वांना आश्चर्यचकित केलं. तर बसपा देखील पंचायत समितीच्या निमित्ताने आपलं खातं उघडलं. या निवडणुकीत शिवसेनेला खातेही उघडा आले नाही त्यामुळे आशिष जैसवालचे वक्तव्य शिवसेनेला भोवल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीला अनिल देखमुख यांच्यावरील आरोप भोवल्याचं दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.