मराठी बातम्या /बातम्या /nagpur /बहिणीची छेड काढल्याने तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, नागपुरातील घटना

बहिणीची छेड काढल्याने तरुणाची धारदार शस्त्राने हत्या, नागपुरातील घटना

कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्याने केली आत्महत्या, हत्याकांडाने गोंदियात खळबळ (प्रातिनिधिक फोटो)

कुटुंबातील तिघांची हत्या करुन त्याने केली आत्महत्या, हत्याकांडाने गोंदियात खळबळ (प्रातिनिधिक फोटो)

बहिणीची छेड काढल्याच्या रागातून दोन भावंडांनी एका तरुणाची हत्या केली आहे.

नागपूर, 19 ऑगस्ट : आपल्या बहिणीची छेड काढल्याच्या (eve-teasing) रागातून दोन भावंडांनी एका तरुणाची हत्या (Youth killed by two brothers) केल्याचा प्रकार समोर आला आहे. नागपुरातील कपिल नगर (Kapil Nagar Nagpur) परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही भावंडांना अटक केली आहे. मृतक तरुणाचे नाव कपिल असून त्याने काही दिवसांपूर्वी आरोपींच्या बहिणीची छेड काढली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मृतक कमलेश याने एका मुलीची छेड काढली होती. या प्रकरणी पीडित तरुणीने कपिल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर कमलेश याला पोलिसांनी अटक सुद्धा केली होती. नुकताच कमलेश हा जामिनावर बाहेर आला होता.

डिमांडनुसार दिले जात होते बॉलिवूड स्टार्सचे न्यूड व्हिडीओ, मुंबईत Sextortion Racket चा पर्दाफाश

आपल्या बहिणीची छेड काढल्याच्या रागातून संतप्त झालेल्या दोन भावंडांनी बुधवारी रात्री कमलेशला गाठले. त्यानंतर दोन्ही भावंडांनी कमलेश याच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली. या प्रकरणात आरोपी उज्वल आणि दीपक यांना त्यांच्याकाही नातेवाईकांनीही मदत केल्याची माहिती समोर येत आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी उज्वल आणि दीपक या दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. बहिणीची छेड काढल्याने या दोघांनी कमलेश याची हत्या केल्याची माहिती समोर येत असली तरी पोलीस या प्रकरणी विविध अँगलने तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime, Nagpur