जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूर / IndvsPak: क्रिकेट सट्ट्याचा नागपूर पोलिसांनी उधळला डाव, 19 ठिकाणी कारवाई करत डझनभर बुकींना अटक

IndvsPak: क्रिकेट सट्ट्याचा नागपूर पोलिसांनी उधळला डाव, 19 ठिकाणी कारवाई करत डझनभर बुकींना अटक

IndvsPak: क्रिकेट सट्ट्याचा नागपूर पोलिसांनी उधळला डाव, 19 ठिकाणी कारवाई करत डझनभर बुकींना अटक

भारत-पाकिस्तानच्या (India-Pakistan) क्रिकेट मॅचदरम्यान देशभरात हजारो कोटींचा सट्टा लावला जातो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नागपूर, 25 ऑक्टोबर: भारत-पाकिस्तानच्या (India-Pakistan) क्रिकेट मॅचदरम्यान देशभरात हजारो कोटींचा सट्टा लावला जातो. या पार्श्वभूमीवर नागपूर (Nagpur police) पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. भारत पाकिस्तान सामन्यात क्रिकेट सट्ट्याचा (Cricket betting) पोलिसांनी डाव उधळून लावला आहे. भारत पाकिस्तान मॅचवर सट्टा लावणाऱ्या 19 ठिकाणी नागपूर पोलिसांची धडक कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती. दरम्यान आणखी काही बुकींना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. हेही वाचा-   पुण्यानं लसीकरणात ओलांडला 50 लाखांचा टप्पा; पालिकेनं मोजले तब्बल एवढे कोटी   दरम्यान पोलिसांच्या धाकानं अनेक बुकिंनी शहराबाहेर धाव घेतली आहे. टीम इंडियाचा पराभव वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तानने टीम इंडियावर (India vs Pakistan) विजय मिळवला. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्ताननं एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर आझम (Babar Azam) 51 बॉलमध्ये नॉट आऊट 66 रनवर आणि मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) 55 बॉलमध्ये नॉट आऊट79 रनवर नॉट आऊट राहिला. हेही वाचा-  India vs Pakistan: टीम इंडियाच्या पराभवानं डिप्रेशन आलंय? ‘हे’ 5 उपाय करतील तुम्हाला नॉर्मल   याआधी टी-20 वर्ल्ड कपच्या 5 मॅचमध्ये आणि वनडे वर्ल्ड कपच्या 7 मॅचमध्ये पाकिस्तानला कधीच भारताचा पराभव करता आला नव्हता. पाकिस्तानचा टी-20 क्रिकेटमधला हा पहिलाच 10 विकेटचा विजय आहे,तसंच भारताने कधीही 10 विकेटने टी-20 मॅच गमावली नव्हती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात