जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / "नानांच्या 'मन की बात'ने राजकारणात गरमी आली पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली का?"

"नानांच्या 'मन की बात'ने राजकारणात गरमी आली पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली का?"

"नानांच्या 'मन की बात'ने राजकारणात गरमी आली पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली का?"

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा केल्यानंतर महाराष्ट्रातील आघाडी सरकारमध्ये आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली. त्यातच नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 जुलै : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. मविआ सराकर **(MVA Government)**मध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला त्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. आता या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून (Shiv Sena mouthpiece Saamana) भाष्य करण्यात आलं आहे. राजकारणात गरमी पण कार्यकर्त्यांत उर्मी आली का? नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळे दोन दिवस राजकारणात गरमी आली पण काँग्रेस कार्यकर्त्यांत उर्मी आली का? असा थेट सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. नाना पटोले यांच्या बोलण्यामुळे महाविकास आघाडीत फूट असल्याचे चित्र विरोधकांनी निर्माण केले पण नानांच्या भाषणाचा खरा रोख भाजपवरच होता असंही सामनात म्हटलं आहे. काँग्रेस नेत्यांच्या भेटीत शरद पवारांकडून थेट सवाल, बैठकीत नाना पटोले गैरहजर मन की बातमुळे खळबळ नाना पटोले यांनी आपली मन की बात सांगितली. त्या मन की बातमुळे थोडी खळबळ माजली. ठीक आहे, होऊ द्या खळबळ. पटोले हे मोकळ्या स्वभावाचे आहेत. जसे भाजपत रावसाहेब दानवे आहेत तसेच काँग्रेसमध्ये नाना पटोले आहेत. नाना पटोले हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून सतत चर्चेत आहेत. शरद पवारांकडून पटोलेंना उत्तर लोणावळ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबिरात नानांनी ताव मारला की, आपल्यावर पाळत ठेवली जात आहे. मला सुखाने जगू दिले जाणार नाही. नाना पटोले पुढे म्हणाले, काँग्रेसचा स्वबळाचा नारा कायम आहे. नानांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसला बळ मिळाले असेल तर चांगले आहे. स्वबळाचा नारा याआधीही त्यांनी दिला आहे आणि त्यात काही चुकीचे नाहीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आपल्या शैलीनुसार ‘स्वबळा’च्या नाऱ्याला उत्तरे दिलीच आहेत असंही सामानाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात