मुंबईत पहाटेपासून पुन्हा मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात

मुंबईत पहाटेपासून पुन्हा मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात

Mumbai Weather Alert: मुंबई पूर्व (Mumbai Rain Updates) उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सायन ,चेंबूर, मानखुर्द,घाटकोपरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जून: मुंबई पूर्व (Mumbai Rain Updates) उपनगरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सायन ,चेंबूर, मानखुर्द,घाटकोपरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. सायन गांधी मार्केट जवळ पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. हिंदमाता (Hindmata) येथेही पाणी साचायला लागलं आहे. सकाळी ६ वाजल्यारासून पाऊस सुरू झाला आहे. तर टिळक नगरमध्येही हळूहळू पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. पाऊस असाच अजून काही वेळ सुरू राहिल्यास पुन्हा एकदा मुंबईत पाणी भरणार आहे. त्यामुळे आजही पाणी भरण्याची शक्यता आहे. मुंबईकरांनी पाऊस पाहूनच बाहेर पडावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

मुंबईसह उपनगरात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतल्या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागानं मुंबई आणि लगतची उपनगरं ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज वर्तवला आहे. यामुळे मुंबईतील अनेक ठिकाणी एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आली आहेत.

मुंबई शहरात सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुढचे तीन तास मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातील काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. संध्याकाळपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस असण्याची शक्यता अधिक असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र मुंबईत संध्याकाळपासून पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

लालबाग, परळ, भायखळा, माझगाव दादर परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. दुसरीकडे वसई विरारमध्ये रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र ढगाळ वातावरण कायम आहे. सलग दोन दिवसापासून वसई विरार नालासोपारा क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरु होती.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी सबवे हा सखल भाग असल्यामुळे तिथे दोन ते तीन फूट पाणी साचले आहे. त्यामुळे अंधेरी सबवे वाहनांसाठी आणि नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. मुंबईसह पश्चिम उपनगरात पहाटेपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे.

Published by: Pooja Vichare
First published: June 11, 2021, 8:00 AM IST

ताज्या बातम्या