मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

नगरसेविकेच्या पतीचा प्रताप; चक्क लसीकरण केंद्रच हायजॅक, महिला कर्मचाऱ्यांना ठेवलं डांबून

नगरसेविकेच्या पतीचा प्रताप; चक्क लसीकरण केंद्रच हायजॅक, महिला कर्मचाऱ्यांना ठेवलं डांबून

Nagpur News: नागपूर शहरात लसीकरण केंद्रावर रविवारी एकच गोंधळ उडाला जेव्हा लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनाच डांबून ठेवण्याचा प्रकार समोर आला.

नागपूर, 14 जुलै: नागपूर शहरातील (Nagpur city) भाजप नगरसेविका रुपाली ठाकूर (BJP Corporator Rupali Thakur) यांचे पती परशु ठाकूर (Parshu Thakur) यांनी लसीकरण केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यांना डांबून ठेवण्याचा प्रकार पुढे आला आहे. ही संपूर्ण घटना राविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. चक्क लसीकरण केंद्रच हायजॅक केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

झालं असं की, लसीकरण केंद्र (Vaccination Center) बंद झाल्याची वेळ झाली होती. शारदा चौक (Sharda Chowk) येथील पालिका शाळेच्या लसीकरण केंद्र बंद करत कर्मचाऱ्यांनी वायल परत पाठवण्याची तयारी सुरू केली होती, मात्र उरलेले वायल मधून नागरिकांना लसीकरण करा अन्यथा वायल आणि तुम्हाला आम्ही बाहेर जाऊ देणार नाही अशी धमकी परशु ठाकूर यांनी दिली.

मोठी बातमी! समितीची खडसेंना क्लीन चिट नव्हती, मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप - सूत्र

यानंतर परशु ठाकूर यांनी लसीकरण केंद्राचे दार बंद करून सर्वांना डांबून ठेवले. महिला कर्मचाऱ्यांनी विरोध केला नंतर लसीकरण केंद्राचे दार उघडले नाही. शेवटी महिला महिला कर्मचाऱ्यांनी शंभर क्रमांकावर फोन करत पोलिसांना केला. थोड्या वेळात पोलीस आले आणि त्यानंतर त्या महिला कर्मचाऱ्यांची सुटका झाली.

आरोप फेटाळले

या प्रकरणी ज्यांच्यावर लसीकरण केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यांना डांबून ठेवण्याचा आरोप आहे ते भाजप नगरसेविका रुपाली ठाकूर यांचे पती परशु ठाकूर यांचं या घटनेबद्दल काय मत आहे हे जाणून घेतले. न्यूज18 लोकमत सोबत बोलताना परशु ठाकूर यांनी आपल्यावरील ससर्व आरोप फेटाळून लावले. तसेच मी कुमालाही डांबून ठेवलेचं नाही असाही दावा त्यांनी केला.

First published:

Tags: Nagpur