धर्मापलीकडे जाऊन माणुसकीचं दर्शन! हिंदू व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून मग सलमानने सोडला रोजा

धर्मापलीकडे जाऊन माणुसकीचं दर्शन! हिंदू व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून मग सलमानने सोडला रोजा

कोरोनाच्या भीतीमुळे बऱ्याच ठिकाणी अनेक तास मृहदेह ताटकळत पडून राहतो, असे असले तरी आजही आपल्या समाजात माणुसकी शिल्लक आहे. काही समजूतदार लोक या माणुसकीपोटी जाती-धर्माच्या भिंती तोडून 'कर्तव्य परम धर्म' मानत संकटात मदतीला धावून येतात. अशीच एक घटना नागपूर (Nagpur Corona Update)मध्ये घडली आहे.

  • Share this:

तुषार कोहळे, नागपूर, 20 एप्रिल: कोरोनामुळे राज्यात (Maharashtra Corona Situation) सध्या गंभीर परिस्थिती आहे. दररोज रुग्णसंख्या वाढत असून मृतांचा आकडाही वाढत आहे. या काळात एखाद्याचा संशयास्पद मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यसंस्काराला जाण्यासही लोकं घाबरतात. त्यामुळे अंत्यविधीची शोकसभा तर सोडाच त्यांना खांदा द्यायला त्याचे कुटुंबीयही पुढे येत नसल्याचे चित्र आहे. बऱ्याच ठिकाणी अनेक तास मृहदेह ताटकळत पडून राहतो, असे असले तरी आजही आपल्या समाजात माणुसकी शिल्लक आहे. काही समजूतदार लोक या माणुसकीपोटी जाती-धर्माच्या भिंती तोडून 'कर्तव्य परम धर्म' मानत संकटात मदतीला धावून येतात. अशीच एक घटना नागपूर (Nagpur Corona Update) मध्ये घडली.

नागपूरच्या खरबी परिसरातील श्रीराम बेलखोडे यांचे हृदयविकाराच्या (Died of a Heart Attack) धक्क्याने निधन झाले. कोरोनाच्या भीतीने नातेवाईक, मित्र आणि शेजार्‍यांनी पाठ फिरवली. 5 तास त्यांचा मृतदेह तसाच पडून होता. बेलखोडे यांच्या घरी कर्ता व्यक्ती कोणी नव्हता, जो अंत्यविधीसाठी लागणारी धावपळ आणि इतर जुळवाजुळव करू शकेल. बेलखोडे यांच्या घरी लहान मुलगा, पत्नी आणि मुलगी असे तिघेच होते. ही माहिती परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरली.

(हे वाचा-मशिदीत सुरू केलं कोव्हिड सेंटर, रमझानच्या महिन्यात उचललं महत्त्वाचं पाऊल)

मृतदेह पाच तास घरीच पडून आहे. अंत्ययात्रेला खांदा द्यायला कोणीही पुढे येत नाही. नातेवाईकांनी पण पाठ फिरवली आहे, हे सलमान रफिक  खान यांना कळाले. रोजा असल्याने ते त्यासाठी तयारी करत होते. पण, त्यांना परिस्थितीचे गांभीर्य आणि एका कुटुंबाला मदतीची गरज असल्याचे लक्षात आले. त्यांनी आपल्या इतर मित्रांना, स्थानिक मशिद कमिटीच्या लोकांना सोबत घेतले. अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य आणले. मात्र, हिंदू पद्धतीनुसार अंत्यसंस्कार (Cremation according to Hindu method) कसे करायचे, हे त्यांना माहीत नव्हते. तेव्हा त्यांनी आपल्या हिंदू मित्राला फोन करून अत्यंविधीच्या पूर्ण प्रक्रिया समजून घेतली. त्यांनतर स्वतः खांदा दिला आणि हिंदू रीतीनुसार मृतदेहावर दिघोरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.

(हे वाचा-कोरोना काळात काय खावं आणि काय नाही? WHO ने दिला आहाराबाबत सल्ला)

त्यानंतरच सलमानने आणि त्यांच्या मित्रांनी रोजा सोडला. सलमान हा शिवसैनिक असून युवासेनेचा पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जेथे कुटुंबीयांनी, मित्रांनी पाठ फिरवली तेथे सलमानसारखे परधर्मीय धावून आले.

Published by: Akshay Shitole
First published: April 20, 2021, 10:04 AM IST

ताज्या बातम्या