जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूर / राज पांडेचा आवाज ऐकून नागपूरकर हळहळले, कुटुंबीयांशी बदल घेण्यासाठी झाली हत्या, VIDEO

राज पांडेचा आवाज ऐकून नागपूरकर हळहळले, कुटुंबीयांशी बदल घेण्यासाठी झाली हत्या, VIDEO

राज पांडेचा आवाज ऐकून नागपूरकर हळहळले, कुटुंबीयांशी बदल घेण्यासाठी झाली हत्या, VIDEO

आईच्या शोषणाचा बदला घेण्यासाठी राज पांडेच्या कुटुंबीयांना धडा शिकवण्यासाठी राजचे अपहरण करून हत्या केली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

नागपूर, 12 जून : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये (Nagpur Crime) गुन्हेगारीचे सत्र सुरूच आहे. रिंग रोड परिसरात एका 15 वर्षीय राज पांडे (Raj Pande) नावाच्या मुलाचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज पांडेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याचा आवाज ऐकून हळहळ व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरामाता नगरमध्ये राहणाऱ्या राज पांडे या मुलाचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. राज पांडे हा उत्कृष्ट सिंगर होता. आज सोशल मीडियावर याचे गाण्याचे विडिओ व्हायरल होत आहे. राजबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेतील आरोपी सुरज शाहू याने आपल्या आईच्या शोषणाचा बदला घेण्यासाठी राज पांडेच्या कुटुंबीयांना धडा शिकवण्यासाठी राजचे अपहरण करून हत्या केली होती. धक्कादायक म्हणजे, खंडणीच्या बदल्यात त्याने राजच्या काकाचे धड मागितले होते. सुरजनं गुरुवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास राज याचं अपहरण केलं होतं.  मागणी पूर्ण न झाल्यानं आरोपीनं मुलाची हत्या करुन मृतदेह रिंगरोड परिसरात फेकून दिला होता. पोलिसांनी सूरजला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात