नागपूर, 7 सप्टेंबर : उधार घेतलेले पैसे परत न दिल्याने एका व्यक्तीची हत्या (Murder) करण्यात आली आहे. नागपुरातील पारडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव काल्या डांगरे (Kalya Dangre) असे असून त्याने 450 रुपये उधार घेतले होते आणि हे उधारीचे पैसे परत न केल्याने त्याची घरात घुसून रविवारी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक (Police arrest two people) केली आहे.
नागपूरच्या पारडी भागात रविवारी झालेल्या काल्या डांगरेच्या हत्येचा उलघडा झाला आहे. उधारीचे 450 रुपये परत न केल्याने गोट्या दुर्गुडे आणि पियुष पंचबुद्धे घरात घुसू हत्या केल्याच कबूल केले. काल्या हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे अनेक गंभीर गुन्हे होते. तो पारडी परिसरात अवैध दारू विक्री करायचा.
...म्हणून टोकाचं पाऊल उचललं, मला माफ करा; पिंपरीत तलाठी पतीनं डॉक्टर पत्नीला निर्घृणपणे संपवलं
काही दिवसांपूर्वी मृतक काल्या याने आरोपींकडून पैसे उसने घेतले होते. त्यातील 450 रुपये शिल्लक होते. त्यावरून मृतक आणि आरोपींमध्ये वाद झाला. त्याच वादातून धारधार शस्त्राने आरोपींनी काल्याची हत्या केली. या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
रविवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास गोट्या आणि पियुष हे दोघेही काल्याच्या घरी पोहोचले. यावेळी दोघांनी आपल्याकडील धारदार शस्त्रांनी काल्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात काल्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.