राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या 10 हजारांखाली; मात्र मृतकांचा आकडा चिंता वाढवणारा

राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या 10 हजारांखाली; मात्र मृतकांचा आकडा चिंता वाढवणारा

Maharashtra Covid19 updates: महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घसरण होत असून आता दैनंदिन रुग्णसंख्या 10 हजारांखाली आली आहे.

  • Share this:

मुंबई, 15 जून: महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोनाची दुसरी लाट आता ओसरल्याचं दिसत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने घसरण (Covid cases decreased) होत आहे आणि कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. आज दैनंदिन रुग्णसंख्या ही 10 हजारांखाली (number of patients is below 10 thousand) आली आहे. आज राज्यात 9350 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

रिकव्हरी रेट 95 टक्क्यांच्या पुढे

आज राज्यात 15176 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 56,69,179 बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट हा 95.69 टक्के इतका झाला आहे. ही एक निश्चितच दिलासादायक बाब महाराष्ट्रासाठी आहे.

मृतकांचा आकडा चिंता वाढवणारा

राज्यात आज एकूण 388 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे सध्या राज्यातील मृत्यू दर हा 1.93 टक्के इतका झाला आहे. मृत्यू दर हा 2 टक्क्यांच्या जवळ पोहोचल्याने चिंता वाढली आहे. आज राज्यात नोंद झालेल्या 388 मृत्युंपैकी 275 मृत्यू हे मागील 48 तासांतील आहेत तर 113 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.

कोरोनामुळे बाळाला दूध पाजणं थांबवू नका; Corona positive मातांसाठी राज्य सरकारच्या गाइडलाइन्स

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच

कडक लॉकडाऊन नंतरही जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 500 हून अधिक आहे. मृत्यू दर देखील 3.40 वर कायम असल्यामुळे चिंता वाढली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज 578 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्यस्थितीत रत्नागिरीत एकूण 4793 सक्रीय रुग्ण आहेत तर आतापर्यंत एकूण 1545 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज कुठल्या विभागात किती रुग्णांची नोंद?

ठाणे मंडळ - 1971

नाशिक मंडळ - 741

पुणे मंडळ - 2411

कोल्हापूर मंडळ - 3232

औरंगाबाद मंडळ - 193

लातूर मंडळ - 350

अकोला मंडळ - 308

नागपूर मंडळ - 144

एकूण - 9350

Published by: Sunil Desale
First published: June 15, 2021, 8:48 PM IST

ताज्या बातम्या