मराठी बातम्या /बातम्या /nagpur /तुमची मुलं Online Game खेळतात? नागपुरात अल्पवयीन मुलीला बसला फटका, अश्लील Video Viral

तुमची मुलं Online Game खेळतात? नागपुरात अल्पवयीन मुलीला बसला फटका, अश्लील Video Viral

तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळत असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवून राहा, त्यांच्या सोबत सतत संवाद करत रहा, जेणेकरून ते या गुन्हेगारांच्या तावडीत सापडणार नाही.

तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळत असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवून राहा, त्यांच्या सोबत सतत संवाद करत रहा, जेणेकरून ते या गुन्हेगारांच्या तावडीत सापडणार नाही.

तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळत असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवून राहा, त्यांच्या सोबत सतत संवाद करत रहा, जेणेकरून ते या गुन्हेगारांच्या तावडीत सापडणार नाही.

नागपूर, 7 जुलै : तुमच्याकडे लहान मुलं ऑनलाईन गेम (online games) खेळत असतील किंवा सतत मोबाइलचा वापर करीत असतील, तर पालकांनी सावध होण्याची गरज आहे. कारण लहान मुलांचे सायबर गुन्हेगारांकडून ब्लॅकमेलिंग होत असल्याचे प्रकार पुढे येत आहे. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 12 वर्षाची मुलगी फ्री फायर हा ऑनलाईन गेम असे. यादरम्यान सायबर गुन्हेगारांनी तिला आपल्या जाळ्यात अडकवले.

धक्कादायक बाब म्हणजे तिला अश्लिल व्हिडीओ (Porn Video Viral) बनवण्यास भाग पाडण्यात आले. त्यांनतर पैशाची खंडणी मागण्यात आली. शेवटी पालकांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. हा फ्री फायर ऑनलाईन गेम सध्या सायबर गुन्हेगारांना गुन्हे करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म बनला आहे. या गेममध्ये हे सायबर गुन्हेगार तुमचे टीम मेंबर बनतात. टीममधील सदस्यांशी मैत्री करतात, विश्वास संपादन केल्यानंतर आपला रंग दाखवायला सुरुवात करतात. थेफ सायकोलॉजीचा वापर करून सुुरुवात अश्लिल चॅटपासून होते. त्यानंतर हळू हळू ते अल्पवयीन मुलांना आपल्या जाळ्यात अडकवतात.

हे ही वाचा-पुण्यातील तरुणाला मुंबईतील दोघांनी फसवलं; पद देण्याच्या बहाण्यानं 30लाखांचा गंडा

हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असेच घडले अवघ्या 12 वर्षाच्या मुलीला या सायबर गुन्हेगारांनी आपल्या जाळ्यात ओढले. फ्री फायर गेम वर बॅड शहजादा नावाने या मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ती तिने स्वीकारली. दोघांमध्ये संवाद वाढला. पुढे अश्लील चॅट व अश्लील व्हिडीओपर्यंत प्रकरण गेलं. आरोपी बॅड शहजादाने सुरुवातीला पैशाची मागणी केली. मात्र पैसे देण्यास मुलीने नकार दिला. तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पीडित मुलगी पैसे देत नसल्याचे लक्षात आल्या नंतर आरोपीने तिचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

मात्र मुलगी 12 वर्षाची अल्पवयीन असल्याने ती पैसे देण्यास असमर्थ होती. त्यामुळे आरोपीने तिचा व्हिडीओ टीम मेंबर असलेल्या तिच्याच परिसरातील सह खेळाडूला व्हॉटसअप वर पाठवला. त्या मुलाने हा प्रकार सुरुवातीला स्वतःच्या आई वडिलांना व त्यांच्या माध्यमातून पीडितच्या आई वडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणात विनयभंगाचा व खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. सध्या नागपूरात अल्पवयीन मुलांना ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचेचे प्रकार वाढायला लागले आहे. त्यामुळे तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळत असेल तर त्यांच्यावर लक्ष ठेवून राहा, त्यांच्या सोबत सतत संवाद करत रहा, जेणेकरून ते या गुन्हेगारांच्या तावडीत सापडणार नाही.

First published:
top videos

    Tags: Cyber crime, Nagpur, Online crime