जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नागपूर / नितीन गडकरींच्या वाढदिवसादिवशी फडणवीसांचा मोठा निर्णय

नितीन गडकरींच्या वाढदिवसादिवशी फडणवीसांचा मोठा निर्णय

नितीन गडकरींच्या वाढदिवसादिवशी फडणवीसांचा मोठा निर्णय

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लाखोंची मनं जिंकली आहेत. त्यांच्या निर्णयानं सर्वांना आनंद झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नागपूर, 28 मे: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लाखोंची मनं जिंकली आहेत. सध्या राज्य कोरोना (Corona Virus) सारख्या महामारीचा सामना करत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. कोरोनामुळे अनेक मुलांनी आपले आई वडील गमावलेत. अशा मुलांसाठी देवेंद्र फडणवीस धावून आलेत. कोरोनामुळे आई वडील गमावलेल्या 100 मुलांना फडणवीस यांनी आधार दिला आहे. या मुलांचं पालकत्व फडणवीस यांनी स्विकारलं आहे. त्यांच्या या निर्णयानं सर्वांनाच आनंद झाला आहे. नागपूरमध्ये श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट आहे. या ट्रस्टकडून केंद्रीय नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त सोबत हा उपक्रम राबवण्यात आला. कोरोनामुळे आपले आई- वडील गमावलेल्या 100 मुलांना आधार देण्याचं काम ही ट्रस्ट करत आहे. दरम्यान या ट्रस्टनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी फडणवीसांनी एक घेत उपस्थितांची मनं जिंकली आहेत. कार्यक्रमात बोलताना, फडणवीसांनी पहिल्याच दिवशी नोंदणी झालेल्या 100 अनाथ मुलांचं पालकत्व स्विकारलं आहे.

जाहिरात

देवेंद्र फडणवीस यांनी संस्थेत नोंदणी झालेल्या मुलांची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. तसंच संस्थेच्या या संपूर्ण कार्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागेल ती मी करेनच. पण आज नोंदणी झालेल्या 100 मुलांच्या पालकत्वाची जबाबदारी मी घेतो, असं फडणवीस यांनी कार्यक्रमात जाहीर केलं.

या कामासाठी सिस्टम तुम्ही लावायचीय, पण जे पाठबळ लागेल ते मी निश्चितपणे देईल, असंही ते सांगायला विसरले नाहीत. तसंच आपण सांगाल तिथे, सांगाल त्या व्यक्तीला भेटायला यायची माझी तयारी आहे. आपण सांगाल त्या दानशूर व्यक्तींना भेटून अनेका मुलांचं पालकत्व स्विकारण्याचं आवाहन करण्यासाठी मी सदैव या ट्रस्टसोबत असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात