VIDEO: नागपुरात डान्सर पेट्रोल चोराचा धुमाकूळ, CCTV पाहून तुम्हीही व्हाल अवाक

VIDEO: नागपुरात डान्सर पेट्रोल चोराचा धुमाकूळ, CCTV पाहून तुम्हीही व्हाल अवाक

Nagpur Dancer Petrol Thieves: नागपूर शहरातील घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

  • Share this:

नागपूर, 22 ऑगस्ट : चाकूचा धाक दाखवून, शस्त्राने वार करून किंवा हातसफाई करून चोराने चोरी केल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील मात्र आता नागपुरात एक वेगळीच घटना समोर आली आहे. नागपुरात (Nagpur) पेट्रोल चोरी करतानाचा चोर सीसीटीव्हीत कैद (Petrol thieves caught in CCTV) झाला आहे. इतकेच नाही तर हा चोर पेट्रोल चोरी करण्यापूर्वी चक्क डान्स करत असल्याचंही दिसत आहे.

डान्स करत चोरी करतांना तुम्ही चोराला बघितले नसेल. पण आसाच एक व्हिडीओ नागपुरातून समोर आला आहे. पेट्रोल चोरी करताना डान्स करतानाचा हा व्हिडीओ आणि डान्सर चोराची नागपुरात चर्चा होत आहे. नागपूरच्या जयताळा भागातील काही दिवसांपासून पेट्रोल चोरीच्या घटना घडत होत्या. दोन दिवसाआधी श्रीकृष्ण हाऊसिंग सोसायटी मधील ग्रीन अंकलेव्ह मध्ये अशीच पेट्रोल चोरीची घटना घडली. जेव्हा सीसीटीव्ही चा तपास केला तेव्हा हा डन्सिंग चोर पुढे आला.

या संदर्भात आता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोराचा शोध सुरू आहे. मात्र डान्स करत चोरी करण्याची चोराची ही हटके स्टाईल सध्या नागपूर शहरात चर्चेचा विषय बनला आहे.

पुण्यात भरदिवसा महिलेला लुटलं

पुण्यातील हडपसरमध्ये भरदिवसा महिलेला लुटण्यात आले आहे. रस्त्यावरुन चालत जात असताना महिलेची पर्स आणि मोबाइल लुटण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसरमधील यश रवी पार्स सोसायटी समोर ही घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दिवसाढवल्या महिलेच्या हातातील पर्स आणि मोबाईल चोरी झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात गेतले असून त्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

Published by: Sunil Desale
First published: August 22, 2021, 11:48 AM IST

ताज्या बातम्या