नागपूर, 18 जून : ज्या डॉक्टरांने कोरोना या महासाथीतून बाहेर काढले, योग्य उपचार केला, त्याच डॉक्टरला अडवण्याचा प्रयत्न एका महिला रुग्णाने केल्याचे वृत्त नागपुरातून समोर आले आहे. या महिला रुग्णाने त्या डॉक्टरला एक कोटींची खंडणी मागितली. इतकच नाही तर पैसे दिले नाही तर तुमच्या मुलामुलींची हत्या केली जाईल, अशी धमकी तिने पत्रातून दिली आहे. नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिल्पा सोसायटीमध्ये राहणाऱ्या शीतल ईटनकर हिला वेब सीरिज बघून अपहरण व खंडणी मागण्याची युक्ती सुचल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टर तुषार पांडे यांना जेव्हा खंडणीचे हे पत्र आले, तेव्हा त्यांनी सुरुवातीला पोलिसांना याची माहिती दिली. ज्या कुरिअर मधून हे पत्र करण्यात आले होते त्या कुरिअरच्या सीसीटीव्हीचा तपास केला असता एका महिलेने हे पत्र खोट्या नावाने पाठवल्याचे पुढे आले. त्यानंतर पोलिसांनी ही महिला कुठून आली व कुठे गेली याचा मागोवा घेण्यासाठी रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्हीने शोध घेतला. तेव्हा लक्षात आलं की, ही महिला नागपूरच्या शिल्पा सोसायटीमध्ये राहणारी शीतल ईटनकर आहे. शिल्पा ही चांगल्या घरातील असून पेशाने फॅशन डिझायनर आहे. शिल्पाचे पती हे सरकारी नोकरीत अधिकारी पदावर आहे. असे असतांना तिने हे पाऊल उचल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हे ही वाचा- इंटरनेटवर पाहून 32 वर्षीय तरुणाची आत्महत्या;मास्क लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह शीतल ईटनकार या मागच्या काही दिवसांपासून सातत्याने वेब सिरीज बघत होत्या. ते बघतांना त्यांच्या डोक्यात कल्पना आली की आपण अपहरणाची धमकी दिली तर आपल्याला सहज पैसा मिळेल. पण धमकी कोणाला द्यायची हा प्रश्न त्यांना पडला. त्यांनतर त्यांना आठवले की आपण जेथे कोविड चा उपचार घेतला त्या डॉक्टर पांडे कडे कोविड काळानंतर खूप पैसा जमा असेल. त्यामुळे शीतल ने डॉ तुषार पांडेला धमकी देऊन खंडणी मागण्याची योजना बनवली. पत्र पाठवल्या नंतर काय करायचे यांचे तिच्याकडे नियोजन नसल्याचे पुढे आले. फक्त व्यवसायातील अति महत्वाकांशा व कमीत वेळ पैसे कमावण्याची लालसा शीतलच्या पोलीस कोठडीत घेऊन गेले. सध्या शीतल ईटनकरला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली असून तिच्या या गुन्ह्यात आणखी काही लोकांचातर सहभाग नव्हता ना याचा शोध पोलीस घेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.