चंद्रपूर : रावण दहन प्रथा बंद करण्यासाठी नागरिकांनी काढली रॅली; पाहा VIDEO

चंद्रपूर : रावण दहन प्रथा बंद करण्यासाठी नागरिकांनी काढली रॅली; पाहा VIDEO

रावणाच्या दहनाला का केला जातोय विरोध? पाहा VIDEO

  • Share this:

हैदर शेख/चंद्रपूर, 14 ऑक्टोबर : गेल्या अनेक शतकांपासून दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या प्रतिमेचं दहन (Burning of the image of Ravan) करण्यात येते. समाजात ही प्रथा रूढ आहे. मात्र अनेक ठिकाणाहून दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या दहनाला विरोध केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या प्रतिमेचं दहन करण्यात येऊ नये या मागणीसाठी आज चंद्रपुरात (Chandrapur News) एक रॅली काढण्यात आली होती.

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या काही संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या रॅलीचं आयोजन केलं होतं. रावणाच्या प्रतिमेचे दहन करू नये असे आवाहन करत या रॅलीचे आयोजन कऱण्यात आलं होतं.

रावणाच्या दहनाला का केला जातोय विरोध? काय म्हणतोय आदिवासी समाज?

महाराजा रावण हे गौंड गणाचे अधिपती होते. त्याकाळचा गौंड गण म्हणजे दैत्य, दानव, राक्षस तर आजचा आदिवासी समाज. त्यामुळे महाराजा रावण हे आदिवासी समाजाचे आदिपुरूष ठरतात. ते आदिवासी समाजाचे श्रध्दास्थान आहेत. भारताच्या बऱ्याच भागात महाराजा रावण यांची मनोभावे पुजा करण्यात येते. इतकेच नाही तर महाराजा रावण प्रकांड पंडीत होते. विविध शास्त्रांचे प्रचंड ज्ञान असुन धर्मशास्त्रात पारंगत होते. त्यामुळेच महाराजा रावण मृत्युशय्येवर असतांना श्रीरामांनी आपल्या धाकट्या भावाला लक्ष्मणाला राजशिष्टाचार, नितीशास्त्राचे धडे घेण्यासाठी रावणाकडे पाठवल्यांचं कथा रूढ आहे.

स्वत:च्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी प्रतीपक्षाच्या अतिशय प्रिय व्यक्ती सीतेचे अपहरण करणे व अशोकवाटीकेत बंदिस्त करणे यामुळे महाराजा रावण तिरस्कारास पात्र ठरत नाहीत असंही अनेकांचं म्हणणं आहे.

अधर्म व दुष्कृत्य आपण ज्याला समजतो त्याची प्राचीन वैदिक वाड़मयात पावलोपावली प्रचिती येते. मग रावणाने केलेले अपहरण हे अधर्म कसे ? असा सवाल आदिवासी समाजाकडून उपस्थित केला जातो.

हे ही वाचा-नागपूर हादरलं, मित्रांना मारहाण करून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

रावणाच्या दहनामुळे आदिवासी समाजात नाराजी

''ज्या महाराजा रावणाच्या प्रतिमेचे जे बहुजनांचे श्रध्दास्थान आहे. रावणाचे दहन डोळ्यांसमोर होत असेल तर कोण सहन करणार? काळ झपाट्याने बदलत आहे, ज्ञानाच्या कक्षा दिवसेंदिवस रूंदावत आहेत आणि अशा परीवर्तनशील काळात असल्या अमानुष प्रथा समाज पाळत असेल तर तो समाज अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. अशा अंध समाजाचा काय उपयोग?'' असा सवाल जागरचे अध्यक्ष अशोक तुमाराम यांनी उपस्थित केला. चंद्रपूरातील समाजसेवक भुषण फुसे म्हणाले की, ज्या कृतीने बहुसंख्य समाजबांधवांच्या भावना दुखावत असतील तर त्या प्रथा तत्काळ बंद कराव्यात. यामुळे सामाजिक स्वास्थ्य व सलोखा बिघडण्याचीच शक्यता अधिक असते. तेव्हा महाराजा रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्याची ही कुप्रथा बंद व्हायला हवी व प्रशासनाने या दिशेने सकारात्मक पाऊल उचलणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: October 14, 2021, 7:32 PM IST
Tags: chandrapur

ताज्या बातम्या