मुंबई, 30 मे: राज्याचा कामाचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयात (mantralaya Mumbai) बॉम्ब (Bomb) ठेवण्याच्या धमकीमुळे एकच गोंधळ उडाला आहे. एका व्यक्तीने निनावी फोन करून मंत्रालयात बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे बॉम्बनाशक पथक बॉम्बचा शोध घेत आहे.
आज दुपारी मंत्रालय परिसरात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा निनावी फोन आला होता. मंत्रालयातील कंट्रोल रुमला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली. त्यामुळे तातडीने यंत्रणा जागी झाली आणि सर्वत्र शोधा सुरू झाला.
अंगणात पडणाऱ्याचा पावसाचा व्हिडीओ करत होता रेकॉर्ड अन् अचानक कोसळली वीज,VIDEO
मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहे. मंत्रालयातील संपूर्ण परिसरात बॉम्ब आहे का याचा तपास सुरू आहे. खबरदारी म्हणून सर्व गेट बंद करण्यात आले आहे. सुदैवाने आज रविवार असल्यामुळे मंत्रालयातील सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी आहे. तसंच कोरोनाच्या नियामवलीमुळे सुद्धा कर्मचाऱ्यांची कमीच उपस्थिती आहे. अन्यथा एकच गोंधळ उडाला असता. बॉम्बनाशक पथक तपास करत आहे.
(ही बातमी लवकरच अपडेट होईल)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.