अमरातवी, 15 एप्रिल: अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील बुरहानपुर मुख्य मार्गावर चर्च समोर असलेली मेमन बंधूंची जुनी इमारत आज सायंकाळी पाच वाजता अचानक कोसळली. इमारत कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. पाहता पाहता हजारो लोकांची गर्दी मुख्य मार्गावर आली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले. धान्याचे व्यापारी मोहम्मद फारूक अब्दुल रज्जाक मेमन, त्यांचे दोन भाऊ व त्यांचे कुटुंबीय या इमारतीत राहत होते. सायंकाळच्या सुमारास बिल्डिंगच्या पडण्यासारखा आवाज येत असल्यामुळे घरातील सर्व सदस्य घराबाहेर निघाले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. इमारत कोसळ्याची ही घटना स्थानिकांनी आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा जोरदार व्हायरल होत आहे.
वाचा : Coronavirus: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणांना दिले महत्वाचे निर्देश ही इमारत गेल्या काही दिवसांपासून शिकस्त झाली होती. अचानक बिल्डिंग पत्त्याप्रमाणे कोसळल्यामुळे बघ्यांची एकच गर्दी झाली होती. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आणि नगरपंचायत प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून जेसीबीच्या सहाय्याने उर्वरित इमारत पाडण्यात आली. बंगळुरूतही अशाच प्रकारे पत्त्यासारखी कोसळली होती इमारत काही महिन्यांपूर्वी म्हणजेच जुलै 2020 रोजी मुसळदार पावसामुळे बंगळुरू येथे सुद्धा इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. बंगळुरूमधील एक तीन मजली इमारत अचानक कोसळली होती. ही दुर्दैवी घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती. या घटनेचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता.