मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /लंडन मॅरेथॉनची सुरू होती तयारी, टेक फर्मच्या CEOचा इलेक्ट्रिक कारने चिरडल्याने मृत्यू

लंडन मॅरेथॉनची सुरू होती तयारी, टेक फर्मच्या CEOचा इलेक्ट्रिक कारने चिरडल्याने मृत्यू

rajlaxmi vijay

rajlaxmi vijay

worli hit and run case : वरळीत हिट अँड रन अपघातात टेक फर्मच्या सीईओ राजलक्ष्मी विजय यांचा मृत्यू झाला. नुकताच त्यांनी टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता आणि त्या लंडन मॅरेथॉनची तयारी करत होत्या.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 मार्च : वरळी सी फेस जवळ झालेल्या हिट अँड रन अपघातात एका टेक फर्मच्या सीईओ असणाऱ्या राजलक्ष्मी विजय यांचा मृत्यू झाला. सकाळी साडे सहा वाजता हा अपघात झाला. यात राजलक्ष्मी यांच्या अंगावरून भरधाव कार गेली. कारची अवस्था पाहिल्यानंतर अपघात किती भीषण होता याची कल्पना येऊ शकते. कारच्या पुढच्या बाजूचा चुराडा झाला आहे.

अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या राजलक्ष्मी या अल्ट्रिस्ट टेक्नॉलॉजिस या टेक फर्मच्या सीईओ होत्या. सकाळी साडे सहाच्या सुमारास भरधाव असलेल्या इलेक्ट्रिक कारने राजलक्ष्मी यांना चिरडले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. राजलक्ष्मी यांच्यासोबत त्यांचे पतीही मॉर्निंग वॉकसाठी सोबत होते. ते शिवाजी पार्कला पोहोचताच त्यांना पोलिसांचा कॉल आला. त्यानंतर राजलक्ष्मी यांचे पती घटनास्थळी दाखल झाले.

बागेश्वर बाबांच्या दरबारात चोरट्यांचा धुमाकूळ, महिलांचे लाखो रुपयांचे दागिने लुटले

कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचं नाव समर मर्चंट असं आहे. कारचा वेग जास्त होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी समर मर्चंटविरुद्ध बेदरकारपणे कार चालवल्याप्रकरणी आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी  गुन्हा दाखल केला आहे.

राजलक्ष्मी या फिटनेसबाबतीत जागरूक होत्या. त्या जॉगर्स फोरमचा एक भागही होत्या. २०२३च्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्येही त्यांनी भाग घेतला होता. राजलक्ष्मी लंडन मॅरेथॉन इव्हेंटची तयारी करत होत्या असं त्यांच्या सहकारी धावपटूने म्हटलं आहे.

First published:

Tags: Mumbai