मुंबई, 21 जानेवारी: घाटकोपरमधील (Ghatkopar) रमाबाई नगर याठिकाणी एका 25 वर्षीय महिलेची डोक्यात लाटणं घालून हत्या (Woman murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्याजाने दिलेले पैसे परत न केल्याच्या कारणातून आरोपी महिलेनं पीडित महिलेला बेदम मारहाण केली आहे. दोन-तीन दिवसांत पैसे देते, अशी विनवणी करूनही आरोपी महिलेनं मारहाण केली आहे. ही मारहाण इतकी भयावह होती की, यामध्ये संबंधित महिलेचा दुर्दैवी अंत झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला असून घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
रेखा धोबी असं हत्या झालेल्या 25 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. तर ममता उके असं गुन्हा दाखल झालेल्या 51 वर्षीय आरोपी महिलेचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ममता हिने काही दिवसांपूर्वी मृत रेखा यांचा पती आशिष याला पाच हजार रुपये 20 टक्के व्याजाने दिले होते. मृताच्या पतीने व्याजाची सर्व रक्कम आरोपी महिलेला दिली होती. पण तिला मुद्दलही लगेच पाहिजे होती. त्यामुळे आरोपी ममता मृत रेखा आणि तिचा पती आशिषा यांच्याकडे सतत पैशांची मागणी करत होती.
हेही वाचा-बाबो! पार्टी देण्यास नकार दिल्याने कोयत्याने केले वार, पुण्यातील तरुणाचा प्रताप
घटनेच्या दिवशी आरोपी ममता पैसे मागण्यासाठी रेखा यांच्या घरी गेली होती. यावेळी पैसे देण्यावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी संतापलेल्या महिलेनं रेखा यांना मारहाण करायला सुरुवात केली. तिने रेखा यांचे केस पडकून त्यांना खाली आपटलं आणि लाटण्याने मारहाण केली. यावेळी ममताने लाटण्याने रेखा यांच्या डोक्यात वर्मी घाव घातले. यातच रेखा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा-झोपेतच केला घात; पत्नीने अपंग पतीला दिला भयंकर मृत्यू,कोल्हापुरला हादरवणारी घटना
प्रत्यक्षदर्शी आणि मृत रेखाच्या नातेवाईकाने सांगितलं की, आरोपी महिला ही रेखा यांच्या घरी आली होती. यावेळी तिने पैशांची मागणी केली. त्यानंतर बाचाबाची झाल्यानंतर आरोपीनं रेखा यांना सुरुवातीला लाटण्याने मारहाण केली. मारहाण झाल्यानंतर रेखा यांनी दोन-तीन दिवसांत पैसे देते असं सांगितलं. पण ममताने काहीही ऐकून घेतलं नाही. तिने मारहाण सुरूच ठेवली. त्यानंतर केसांना पकडून आपटलं. यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.