Home /News /pune /

बाबो! पार्टी देण्यास नकार दिल्याने कोयत्याने केले वार, पुण्यातील तरुणाचा प्रताप वाचून बसेल धक्का

बाबो! पार्टी देण्यास नकार दिल्याने कोयत्याने केले वार, पुण्यातील तरुणाचा प्रताप वाचून बसेल धक्का

Crime in Pune: पिंपरी चिंचवड परिसरातील देहूगाव याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने पार्टी न दिल्याच्या कारणातून आपल्या नातेवाईकावर कोयत्याने वार केले आहेत.

    पुणे, 21 जानेवारी: पुण्यानजीक (Pune) असणाऱ्या पिंपरी (Pimpri) परिसरातील भोसरी येथील गुळवे वस्ती परिसरात दोन दिवसांपूर्वी एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने वार करत संबंधित युवकाचं डोकं ठेचलं होतं. ही धक्कादायक घटना ताजी असताना, पिंपरी परिसरातील देहूगावात एका तरुणावर कोयत्याने वार (attack with scythe ) केल्याची घटना घडली आहे. पार्टी न देण्यास नकार दिल्याच्या कारणातून (young man refused to give party) हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जखमी युवकाने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आकाश चंद्रकांत पाटोळे असं गुन्हा दाखल झालेल्या 28 वर्षीय आरोपीचं नाव आहे. तो देहूगाव येथील रहिवासी आहे. तर निखिल नंदनराज चव्हाण असं हल्ला झालेल्या 32 वर्षीय तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी गुरुवारी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हेही वाचा-झोपेतच केला घात; पत्नीने अपंग पतीला दिला भयंकर मृत्यू,कोल्हापुरला हादरवणारी घटना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखील चव्हाण हा आपले नातेवाईक सर्जेराव ओव्हाळ उर्फ दावडीकर यांच्या घरासमोरील मोकळ्या मैदानात मित्रांसोबत डान्स करत होता.  यावेळी निखीलच्या भावकीतील आणि नातेवाईक असणारा आरोपी तरुण पाटोळे याठिकाणी आला. त्याने फिर्यादीकडे पार्टी मागितली. पण फिर्यादीनं पार्टी देण्यास नकार दिला. पार्टी देण्यास नकार दिल्याच्या कारणातून आरोपीनं फिर्यादीवर धारदार कोयत्याने वार केले. या हल्ल्यात फिर्यादीच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. हेही वाचा-भरपूर शिकला पण वाया गेला; कौमार्यभंगाच्या कारणातून पुण्यातील तरुणीचा अमेरिकेत छळ या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जखमी तरुण निखील चव्हाण यानं देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केली नसून घटनेचा सविस्तर तपास केला जात आहे. केवळ पार्टी न दिल्याच्या कारणातून तरुणानं असं कृत्य केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Pune

    पुढील बातम्या