मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /VIDEO: पत्नीनं पतीला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं, मुंबईत भररस्त्यात गाडीच्या बोनेटवर चढून केला राडा

VIDEO: पत्नीनं पतीला गर्लफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं, मुंबईत भररस्त्यात गाडीच्या बोनेटवर चढून केला राडा

नवरा-बायकोच्या भांडणामुळे पेडर रोड झालं जाम, रस्त्यातच गाडी थांबवून काय केलं पाहा VIDEO

नवरा-बायकोच्या भांडणामुळे पेडर रोड झालं जाम, रस्त्यातच गाडी थांबवून काय केलं पाहा VIDEO

नवरा-बायकोच्या भांडणामुळे पेडर रोड झालं जाम, रस्त्यातच गाडी थांबवून काय केलं पाहा VIDEO

मुंबई, 13 जुलै : जर एखाद्या पत्नीला आपलाच नवरा दुसऱ्या मुलीबरोबर रोमान्स करताना दिसला तर काय होईल हे खरतर सांगायची गरज नाही. मात्र मुंबईच्या पेडर रोड परिसरात भररस्त्यात एक महिलेने राडा घातला. या महिलेने आपल्या पतीला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत पकडले, आणि रस्त्यातच भांडणाला सुरुवात झाली. यामुळे काही काळ ट्रॅफिकही जाम झाले होते. या सगळ्या हायवोल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये ही महिला रस्त्यातच गाडी थांबवून पतीच्या गाडीच्या समोर जाऊन उभी राहताना दिसत आहे. ती पतीला गाडीच्या बाहेर येण्यास सांगते, यासाठी तिनं रस्त्यातच गाडी थांबवून ठेवली. ही महिला आपली पतीचा पाठलाग करत असावी. कारण व्हिडीओमध्ये आपली गाडी थांबवून ती पतीच्या गाडीसमोर उभी राहते.

वाचा-तब्बल 3 महिने चालवत होता SBIची खोटी शाखा, खरे अधिकारी आले आणि...

गाडीमध्ये पतीला एका मुलीसोबत बसलेले पाऊन या महिलेचा पारा चढतो. रस्त्यातच गाडीवर ती चप्पल फेकून मारते. बोनेटवर चढून बसते. गाडीची काचही खाली करण्याचा प्रयत्न करते पण महिलेचा पती गाडीतून बाहेर उतरत नाही. हा सगळा ड्रामा सुरू असताना पेडर रोडवर जाम झाला. हा सगळा ड्रामा पाहून ट्रॅफिक पोलिसही पोहचले. त्यांनी महिलेला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेने कोणाचे ऐकले नाही.

वाचा-जबरदस्त! डोळ्यांनी दिसत नसताना अंध तरुणानं केलं खतरनाक स्टंट, पाहा VIDEO

गाडीच्या बोनेटवर चढून काढला राग

रागात महिलेने गाडीच्या काचेवर चप्पल फेकून मारली. बोनेटवर चढून गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न करत होती. अखेर पती गाडीच्या बाहेर आला. बाहेर आल्यानंतर महिलेनं त्याला कॉलरला पकडून ओढले आणि लाथा बुक्क्यानं मारण्यास सुरुवात केली. नंतर ती महिला आपल्या पतीसह कारमध्ये बसली. थोड्या अंतरावर गेल्यानंतर पुन्हा खाली उतरली आणि हाणामारी करू लागली. जेव्हा महिलेनं पतीवर हल्ला केला तेव्हा पोलिसांनीही हस्तक्षेप केला. हा गोंधळ बराच काळ सुरू होता, यामुळं पेडर रोड काही काळ जाम झाला होता. दरम्यान याप्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही.

वाचा-VIDEO - जावयाचा असा पाहुणचार पाहाल; तुम्हीही म्हणाल अशीच सासू हवी मला

First published:
top videos

    Tags: Video viral