मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai: इंटरनेटवरून विधवा अन् घटस्फोटीत महिलांना हेरायचा; मग अशी करायचा फसवणूक

Mumbai: इंटरनेटवरून विधवा अन् घटस्फोटीत महिलांना हेरायचा; मग अशी करायचा फसवणूक

Crime in Mumbai: मॅट्रिमोनियल साईटवरून (Matrimonial site) उच्च शिक्षित, विधवा आणि घटस्फोटित महिलांना हेरून त्यांना लुटणाऱ्या (Fraud of widow and divorced women) एका भामट्याला मुंबई पोलिसांनी अटक (Accused arrest) केली आहे.

  • Published by:  News18 Desk
डोबिंवली, 02 जुलै: मॅट्रिमोनियल साईटवरून (Matrimonial site) उच्च शिक्षित, विधवा आणि घटस्फोटित महिलांना हेरून त्यांना लुटणाऱ्या (Fraud of widow and divorced women) एका भामट्याला मुंबई पोलिसांनी अटक (Accused arrest) केली आहे. आरोपी तरुण मेट्रोमोनियल साईटवर बनावट अकाऊंट (Fake account) काढून महिलांची फसवणूक करत होता. पण एका महिलेनं पोलिसांत तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. मागील दोन महिने तपास केल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास मुंबईतील विष्णूनगर पोलीस करत आहेत. शैलेश बांबार्डेकर ऊर्फ प्रथम माने असं अटक केलेल्या 35 वर्षीय आरोपी व्यक्तीचं नाव आहे. त्यानं आतापर्यंत अनेक महिलांना आणि तरुणींना फसवलं असल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपीनं 16 एप्रिल रोजी एका महिलेला फसवून तिच्याकडील 10 तोळे सोनं चारून नेलं होतं. यानंतर आरोपीनं आपला संपर्क तोडला होता. आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच पीडित महिलेनं विष्णूनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर दोन महिने अखंड तपास केल्यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अटक केली आहे. हेही वाचा-उसने पैसे परत न केल्यानं सासूलाच केलं टार्गेट; जावयाचं कृत्य पाहून पोलिसही हैराण गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी शैलेशला कांदिवली येथून अटक केली आहे. साम टीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी आरोपीकडून 140  ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरोपीन अशाच पद्धतीनं आणखी 3 महिलांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. विरार येथील असणाऱ्या शैलेशनं मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर प्रथम माने या बनावट नावानं अकाऊंट ओपन करून महिलांना फसवणूकीचा धंदा सुरू केला होता. पण त्याचा फसवणुकीचा व्यवसाय फार काळ टिकला नाही. हेही वाचा-कराटे शिक्षकानं अल्पवयीन मुलीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात; सज्ञान होताच नेलं पळवून आरोपी शैलेशनं मॅट्रिमोनियल साइटवर आपण उच्चशिक्षित असल्याची माहिती दिली होती. त्याच आधारावर तो उच्च शिक्षित आणि खासकरून घटस्फोटित आणि विधवा महिलांशी ओळख करायचा. यानंतर त्यांना लग्नाचं आमिष दाखवत त्यांच्याशी जवळीक साधायचा. विश्वास संपादन होताचं आरोपी पीडित महिलांचे पैसे आणि महागडे दागिने घेऊन पसार व्हायचा. या घटनेचा पुढील तपास विष्णूनगर पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Financial fraud, Mumbai

पुढील बातम्या