जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / सुशांतच्या पोस्टमॉर्टेमच्या वेळी 'ती' व्यक्ती का रडत होती? नितेश राणेंनी समोर आणला VIDEO

सुशांतच्या पोस्टमॉर्टेमच्या वेळी 'ती' व्यक्ती का रडत होती? नितेश राणेंनी समोर आणला VIDEO

रुपमकुमार शाह हे शवागृहामध्ये कर्तव्यावर होते. त्यामुळे ते या प्रकरणात प्रमुख साक्षीदार मानले जातात.

रुपमकुमार शाह हे शवागृहामध्ये कर्तव्यावर होते. त्यामुळे ते या प्रकरणात प्रमुख साक्षीदार मानले जातात.

रुपमकुमार शाह हे शवागृहामध्ये कर्तव्यावर होते. त्यामुळे ते या प्रकरणात प्रमुख साक्षीदार मानले जातात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 02 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी पुन्हा नव्याने वाद सुरू झाला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सुशांतचा मृतदेह घेऊन जात असलेला व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओ पोस्टमॉर्टमला घेऊन जात असल्याचा दावा नितेश राणेंनी केला आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी नितेश राणे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर आता सुशांत सिंह राजपूत याचा एक व्हिडीओ नितेश राणेंनी ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये सुशांतचा मृतदेह घेऊन जात असल्याचा दावा राणेंनी केला आहे.

जाहिरात

यावेळी त्याच्यासोबत रुपमकुमार शाह होते. रुपमकुमार हे सुशांतच्या पोस्टमार्टेमसाठी उपस्थित होते. त्यांना रडू कोसळलं होतं. खरं सत्य काय आहे, लवकरच बाहेर येईल. बेबी पेंग्विन आता दूर नाही, असं नितेश राणे ट्वीटमध्ये म्हणाले. दरम्यान, रुपमकुमार शाह हे शवागृहामध्ये कर्तव्यावर होते. त्यामुळे ते या प्रकरणात प्रमुख साक्षीदार मानले जातात. पोस्टमॉर्टममध्ये बदल केल्याचा गंभीर आरोप शाह यांनी केला होता. पण, या प्रकरणाचा वेगवेगळ्या अंगाने पोलिसांनी तपास केला. सुशांतने आत्महत्याच केलाचा निष्कर्ष पोलीस आणि सीबीआयने केला आहे. दिशा सालियान प्रकरणाची SIT मार्फत होणार चौकशी दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिशा सालियान प्रकरणाचा मुद्या उपस्थितीत केला आणि अपेक्षेप्रमाणे शिंदे गटाने अधिवेशनातही मुद्दा मांडला. आमदार भरत गोगावले यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी गोंधळ घातला. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. दिशा प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे. जे काही पुरावे आहे, ते त्यांनी द्यावे या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. दिशाचा प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे गेला नव्हता, तो तपास हा मुंबई पोलिसांकडेच होता. सीबीआयकडे सुशांतच्या प्रकरणाचा तपास होता. कुठलाही राजकीय हेतू नाही. कुणालाही टार्गेट करण्याचा हेतू नाही, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात