Home /News /mumbai /

VIDEO : NDRF ची मदत नाही, अशावेळी मंगेशचा देशी जुगाड; 5 महिलांना मृत्यूच्या दारातून आणलं खेचून

VIDEO : NDRF ची मदत नाही, अशावेळी मंगेशचा देशी जुगाड; 5 महिलांना मृत्यूच्या दारातून आणलं खेचून

चिपळुणमधील मंगेशने आपल्या जीवाचा विचार न करता 20 फूट पाण्यात उतरला. एक योजना आखत त्याने 5 महिलांचा जीव वाचवला.

    जेव्हा सरकारी मदत पोहोचली नव्हती, त्यावेळी स्वत:चा जीव धोक्यात घालून एका तरुणाने 5 महिलांचा जीव वाचवला. हे वृत्त आहे रत्नागिरीमधील चिपळूण शहरातील. येथे गेल्या दोन दिवसांपासून पूरपरिस्थिती आहे. इतक्या भयंकर परिस्थितीत मदतकार्य करण्यासाठी एनडीआरएफला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. (Heavy Rain in Kokan) यामध्ये चिपळूणमधील खिर्डी या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. येथे नागरिकांनी एकमेकांची मदत करून माणुसकीचा आदर्श समोर ठेवला आहे. ही कहाणी आहे 35 वर्षी मंगेश पवार याची. मंगेशने आपल्या जीवाचा विचार न करता 5 महिलांच्या मदतीसाठी धावला व त्यांचा जीव वाचवला. (Mangesh Pawar's courage in Chiplun is appreciated) मंगेश चार मजल्याच्या इमारतीत राहतो. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी आलं होतं. मंगेशच्या घरासमोर एक अन्य एक मजली घऱ आहे. येथे एक ज्येष्ठ महिलेसह एकूण 5 महिला राहतात. जेव्हा पहिल्या मजल्यावरुन पाणी वर चढू लागलं होतं, नागरिकांनी मदतीची मागणी केली. मंगेश आणि त्याच्या मित्रांनी अनेक सरकारी मदत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र कोणाशीच संपर्क होऊ शकला नाही. शेवटी मंगेश आणि त्याच्या काही मित्रांनी देशी जुगाड लावत महिलांच्या मदतीसाठी योजना तयार केली. हे ही वाचा-अनेकांचा जीव घेणारी दरड कोसळते तेव्हा नेमकं काय होतं?  Live Video पाहून हादराल! सर्व मित्रांमध्ये मंगेश एकटाच पाहू शकत होता. यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घालण्याचं ठरवलं. त्याने तब्बल 20 फूट पाण्यात उडी मारली आणि पोहत त्या महिलांपर्यंत एक रश्शी पोहोचवली. त्यानंतर महिलांच्या कंबरेला प्लास्टिकचा डबा बांधला आणि सायकलच्या ट्यूबमध्ये हवा भरून एक एक करीत 5 महिलांना आपल्या चार मजली इमारतीच्या दिशेने खेचायला सुरुवात केली. मंगेशचं हे धाडस आजूबाजूच्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. त्यांच्या धाडसाचही मोठं कौतुक केलं जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Positive story, Rain flood, Rainfall, Ratnagiri

    पुढील बातम्या