मुंबई, 9 एप्रिल: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यभरात लादण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये शुक्रवारी रात्री ते सोमवारी सकाळी कडक लॉकडाऊनच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकीकडे लसीकरण सुरू असताना लॉकडाऊनचे नेमके नियम असतील, याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. मात्र शहरातील वीकेंड लॉकडाऊनविषयी नवी माहिती आता समोर आली आहे. मुंबईत आज रात्रीपर्यंत 1 लाख 88 हजार लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्या आणि परवा वीकेंड लॉकडाऊन असला तरी लसीकरण सुरू राहील. नागरिकांना नोंदणीचा मेसेज दाखवून प्रवास करता येईल, अशी माहिती आहे. हेही वाचा - कोरोनाला रोखण्यासाठी देशपातळीवर आज महत्त्वपूर्ण meeting, मोठा निर्णय होण्याची शक्यता मुंबई महापालिकेने कोव्हिडच्या सर्व उपाययोजना या जून महिन्यापर्यंत तयार ठेवल्या आहेत, असंही सांगण्यात येत आहे. मुंबईत काय सुरू राहणार? - वीकेंड लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. पण वाहतुकीची साधने जसे रेल्वे सेवा, बस, रिक्षा सुरू राहतील - हॉटेलमधून होम डिलिवरी सुरू राहील - नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार - अनावश्यक गोष्टींसाठी घराबाहेर पडण्यास मनाई दरम्यान, 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त राज्यात मिनी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. हे निर्बंध लावताना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे, असं सरकारकडून सांगण्यात आलं. शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय घेण्यात आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.