मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Fletcher Patel आणि NCB चा काय संबंध? तीन केसेसमध्ये एकच पंच कसा? नवाब मलिकांचा सवाल

Fletcher Patel आणि NCB चा काय संबंध? तीन केसेसमध्ये एकच पंच कसा? नवाब मलिकांचा सवाल

Nawab Malik on NCB action: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Nawab Malik on NCB action: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Nawab Malik on NCB action: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

मुंबई, 16 ऑक्टोबर : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत एनसीबी (NCB)च्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एनसीबीच्या तीन वेगवेगळ्या कारवाईत एकच साक्षीदार असल्याचा गौप्यस्फोट करत नवाब मलिकांनी एनसीबीला काही प्रश्न विचारले आहेत. कोण आहे फ्लेचर पटेल? (Fletcher Patel) त्याचा एनसीबी आणि त्यापैकी एका अधिकाऱ्याशी काय संबंध आहे? असा सवाल नवाब मलिकांनी उपस्थित केला आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, कोण आहे फ्लेचर पटेल? त्याचा एनसीबी आणि त्यापैकी एका अधिकाऱ्याशी काय संबंध आहे? एनसीबीने याचा खुलासा करावा. समीर वानखेडे (Sameer Vankhede) यांच्या पब्लिसिटी ते अनेक कार्यक्रम आयोजित करत आहेत. फ्लेचर पटेल यांच्यासोबत समीर वानखेडे यांचे फोटो काय सांगतात ?

छापेमारीच्या कारवायांमध्ये कौटुंबिक मित्रालाच पंच केलं का? पंच म्हणुन जवळची लोक आहेत, या कारवाई मग ठरवून केल्या गेल्या का ? कोणते रॅकेट मुंबईत चालु आहे, फ्लेचर पटेल लेडी डॉन फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय करतायेत? फ्लेचर पटेल आणि लेडी डॉनच्या मदतीने फिल्म इंडस्ट्रीत काय सुरू आहे, वानखेडे हे फिल्म इंडस्ट्रीला टार्गेट करतायेत असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

तीन केसेसमध्ये एकच पंच

25/11/2020 रोजी करण्यात आलेल्या कारवाईतील पंचनाम्यामध्ये फ्लेचर पटेल पंच आहे. त्यानंतर 09 /12/2021 रोजीच्या सर्च ऑपरेशनमध्ये फ्लेचर पटेल पंच हेच आहेत आणि 2 जानेवारी 2021 रोजीच्या छापेमारी करण्यात आली त्यातही फ्लेचर पटेल पंच आहेत. तीन केससमध्ये फ्लेचर पटेल पंच आहेत समीर वानखेडे यांनी याचं उत्तर द्यावे असा सवालही नवाब मलिकांनी केला आहे.

"माझा जावई ड्रग्ज पेडलर असल्याच्या बातम्या पेरल्या गेल्या"

14 ऑक्टोबर रोजी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबीवर निशाणा साधला होता. आपल्या जावयाला विनाकारण ड्रग्ज प्रकरणात गोवलं गेल्याचा दावाही यावेळी नवाब मलिक यांनी केला आहे. माझा जावई समीर खान ड्रग्ज पेडलर असल्याचं सांगत बातम्या पेरण्यात आल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिकांचा जावई ड्रग्ज पेडलर (drug peddler) असल्याचं भाजप नेते म्हणतात. राष्ट्रवादीला (NCP) बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एनसीबीने मलिकांचे जावई समीर खान (Sameer Khan) ड्रग्ज पेडलर असल्याचं सांगून बातम्या पेरण्यात आल्या. या प्रकऱणात जावयाला अडकवण्यात आलं. जावई साडे आठ महिने कारागृहात होता. कुटुंबीयांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

जावयाच्या कार्यालयातून गांजा जप्त केल्याचा बातम्या खोट्या

एनसीबीने केलेल्या कारवाई दरम्यान 200 किलो गांजा सापडला असं सांगण्यात आलं होतं. पण गांजा सापडलाच नाही तर हर्बल तंबाखू असल्याचं अहवालात नमूद आहे. जावयाच्या कार्यालयातून गांजा जप्त केल्याचा बातम्या खोट्या आहेत. एनसीबीला गांजा आणि तंबाखू यामधला फरक ओळखता येत नाही? असा सवालही नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

First published:

Tags: Nawab malik, NCB