सोमवारी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील कोरोना परिस्थितीविषयी चर्चा झाली. यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याविषयी माहिती दिली.
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाबतीत तक्रारी आणि सूचना आल्याचं राज ठाकरे म्हणाले. मी मुख्यमंत्र्यांसमोर तक्रारींचा नाही तर सूचनांचा पाढा वाचल्याचे राज ठाकरे म्हणाले. जाणून घ्या कोणत्या सूचना राज यांनी उद्धव ठाकरेंना दिल्या आहेत.