केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या कुटुंबात नव्या पाहुण्याचं स्वागत; केक कापून केलं सेलिब्रेशन

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या कुटुंबात नव्या पाहुण्याचं स्वागत; केक कापून केलं सेलिब्रेशन

रामदास आठवलेंनी आपल्या कवितांच्या अनोख्या शैलीत नामकरण केलं आहे

  • Share this:

मुंबई, 15 फेब्रुवारी : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक चांगली बातमी दिली आहे. रामदास आठवले यांनी आज बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात भेट देत सिंबा नावाच्या अडीच वर्षाच्या बिबट्याला दत्तक घेतलं आहे. गेल्या चार वर्षांहून अधिक काळापासून रामदास आठवले आपला मुलगा जीत याच्या आग्रहाखातर एका बिबट्याला दत्तक घेण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर आज तो दिवस उजाडला. त्यांनी या बिबट्याचं नाव सिंबा असं ठेवलं आहे. (Welcome to the family of Union Minister Ramdas Athavale )

रामदास आठवले यांनी सिंबाच्या वाढदिवसानिमित्ताने केक कापून त्याचं स्वागत केलं. रामदास आठवलेंनी आपल्या शैलीत सिंबाचं नामकरण केलं.

हे ही वाचा-Pooja Chavan case: ऑडिओ क्लीप कशा आल्या बाहेर? धक्कादायक माहिती झाली उघड

आपली वक्तव्य आणि कवितांमुळे रामदास आठवले नेहमी चर्चेत असतात. कंगना रणौत प्रकरणात रामदास आठवले यांनी अभिनेत्रीला सुरक्षा देणार असल्याची घोषणा केली होती. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह याच्या आत्महत्येनंतर पोलिसांवर टीका करीत सत्ताधारी शिवसेनेवर तोफ डागली होती. कंगनाने मुंबईची तुलना पाकच्या ताब्यात असलेला काही भागासोबत  (पीओके) सोबत केली होती. (Welcome to the family of Union Minister Ramdas Athavale ) ज्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊन यांनी अभिनेत्रीला कथित स्वरुपात शहरात परतू नये असं सांगितलं होतं.

 

Published by: Meenal Gangurde
First published: February 15, 2021, 6:47 PM IST

ताज्या बातम्या