मुंबई, 29 मार्च : मुंबईत निर्बंध कडक केले तरी नागरिक कोरोना नियमावलीचं पालन करीत नसल्याचं दिसत आहे. राज्य सरकारने सर्वांना सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य केला आहे. मात्र असं केलं असतानाही अनेकजणं विनामास्क फिरत असल्याचं दिसून येत आहे. आता तर मुंबई पोलिसांनी नियम न पाळणाऱ्यांविरोधात वेगळात प्रकार केला आहे. करोना महामारी संदर्भातील नियम न पाळल्याने मुंबई पोलिसांनी अशा नागरिकांना कोंबडा बनत चालण्याची शिक्षा दिली आहे. याचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये मुंबईतील समुद्राजवळ काही नागरिक कोंबडा होऊन चालत असताना दिसत आहे. (walked around without a mask strange punishment given by Mumbai Police)
मात्र काही जणांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. अशा प्रकारची शिक्षा देणे योग्य नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ट्वीट करीत कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालं तर त्यावर कायदेशीर कारवाई करता येते, यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे आणि दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं लिहिलं आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी कोंबडा बनवून रस्त्यात फिरवलं, पाहा VIDEO pic.twitter.com/3dG8Wz3odO
— News18Lokmat (@News18lokmat) March 29, 2021
हे ही वाचा-100 पैकी 20 बळी; नागपुरात कोरोना मृत्यूचा भीषण आकडा, धक्कादायक कारण समोर
राज्यात कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मुंबईतही कोरोना रुग्णांचा आलेख वाढता आहे. मुंबईत रविवारी जवळपास 7000 रुग्णांची नोंद झाली असून जी मुंबईसारख्या गर्दीच्या शहराची चिंता वाढवणारी आहे. मुंबईतील कोरोनाचा उद्रेक होत असलेली पहिल्या पाचातील 4 प्रभागं ही पश्चिम उपनगरातली आहेत. आणि दर आठवड्याला याच वॉर्डातील कोरोना रुग्णांची दरवाढ वर-खाली होत आहे. त्याच बरोबर दर आठवड्याला रुग्ण वाढीचा दरही अनेक प्रभागात जवळपास तीन पटीने वाढला आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात बांद्रा पश्चिम हा सगळ्यात मोठा हॉटस्पॉट आहे. आणि त्या खालोखाल गोरेगाव, चेंबूर पश्चिम, अंधेरी पश्चिम, आणि अंधेरी पूर्व असे अनेक हॉटस्पॉट बघायला मिळतात. एका आठवड्यात जवळपास 1500 ते 2300 इतके रुग्ण अनेक प्रभागात वाढले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Mask, Mumbai