Home /News /nagpur /

प्रत्येकी 100 पैकी 20 बळी; नागपुरातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा भीषण आकडा, धक्कादायक कारण आलं समोर

प्रत्येकी 100 पैकी 20 बळी; नागपुरातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा भीषण आकडा, धक्कादायक कारण आलं समोर

नागपुरातील (Coronavirus in Nagpur) दोन सरकारी रुग्णालयांतील मृत्यूदर (Corona patient death rate in nagpur) हा जिल्ह्याच्या एकूण मृत्यूदराच्या नऊपट आहे

    नागपूर, 29 मार्च :  देशात सर्वाधिक रुग्ण असलेल्या दहा जिल्ह्यांच्या यादीत नागपूरचाही (Coronavirus in Nagpur) समावेश आहे. नागपुरात कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. कोरोना रुग्णांची संख्या तर वाढतेच आहे. शिवाय अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे कोरोना रुग्णांचा बळी (Corona patient death in Nagpur) जातो आहे. कोरोना महासाथ आल्यापासून गेल्या बारा महिन्यांत नागपुरात दोन सरकारी रुग्णालयातच 20% रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मार्चच्या चौथ्या आठवड्यात नागपूर जिल्ह्यात 25,740 कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या वर्षभरात आठवड्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. आठवड्याचा हा आकडा कोरोना महासाथ आल्यापासून वर्षभरात फक्त सप्टेंबर महिना वगळता महिनाभरातील आकड्यापेक्षाही जास्त आहे. रविवारी तब्बल 58 मृत्यू झाले. मृत्यूचा आकडाही सर्वात जास्त आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय  (GMCH)  तसंच इंदिरा गांधी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (IGGMCH) दाखल झालेल्या रुग्णांपैकी वर्षभरात प्रत्येकी 100 रुग्णांपैकी 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या दोन रुग्णालयांतील मृत्यूदर हा जिल्ह्याच्या एकूण मृत्यूदराच्या नऊपट आहे, असं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. मृत्यूच्या आकड्यापेक्षाही भयावर आहे ते मृत्यूमागील कारण. कोरोना रुग्णांच्या मृत्यू झाला आहे तो अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे. हे वाचा - होळीच्या दिवशी राज्यात कोरोनाचा भडका; 24 तासात 40,414 नवे रुग्ण नागपुरातील रुग्णालयात बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची कमतरता आहे. खासगी रुग्णालयं हेच कारण देत त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय महाविद्यालयं किंवा इतर रुग्णालयात पाठवत आहे. बेड आणि व्हेंटिलेटर उपलब्ध आहे की नाही याची खात्री केल्याशिवाय रुग्णांना सरकारी रुग्णालयात पाठवू नये, असं प्रशासनाने सांगितलं आहे. अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर होत आहे त्यामुळे जास्तीत जास्त व्हेलिंटेर मिळवण्यासाठी खासगी रुग्णालयांचे प्रयत्न सुरू आहेत. पण महिनाभरापासून अनेक रुग्णालयं प्रतीक्षा यादीत आहे. कारण पुरेशा प्रमाणात मशीन्स उपलब्ध नाहीत. शिवाय भाड्यानेदेखील मिळणं शक्य नाही. हे वाचा - महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लावण्याच्या हालचाली, मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्ट आदेश दरम्यान पुढील दोन आठवड्यात दिवसाला एक हजार मृत्यूची होतील, असा इशारा आरोग्य विभागाने याआधी दिला होता. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलं होतं. सध्या राज्यात  41% पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहे. त्यापैकी 8% गंभीर आहेत आणि 0.71%  व्हेंटिलेटरवर आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये उपचाराच्या योग्य सुविधा नाहीत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार पुरेशा प्रमाणात नॉन ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर आहेत पण जवळपास 4,000 पेक्षा जास्त ऑक्सिजन बेडची गरज आहे. नागपूर आणि ठाण्याने जर त्यांच्या सुविधा वाढवल्या नाहीतर तर या रुग्ण वाढ आणि रुग्ण मृत्यूबाबतील या दोन्ही जिल्ह्यांची परिस्थिती खूपच गंभीर होईल, असंही आरोग्य विभागाने सांगितलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Corona updates, Coronavirus, Nagpur

    पुढील बातम्या