मुंबई, 08 सप्टेंबर : कोरोनाच्या काळात नवीन टेक्नोलॉजीच्या मदतीनं वेगवेगळे नवीन फीचर्स घेऊन अनेक मोबाईल कंपन्या नवीन फोन लाँच करत आहे, सॅमसंग, ओपोला टक्कर देण्यासाठी आता VIVO कंपनीनं आणखीन एक भन्नाट फीचर आणलं आहे.
अॅण्ड्रॉइड अथॉरिटीने वीबोने प्रसिद्ध केलेला व्हिडिओ स्पॉट केला आहे. त्यात विवोचा नवीन फोन दिसत आहे. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे बटण दाबल्यानंतर या फोनचा रंग बदलतो. हा फोन बाजारात कधी येणार आणि त्यासंदर्भातील इतर डिटेल्स अद्याप मिळू शकले नाहीत. मात्र या फोनमध्ये मागच्या पॅनलचा रंग एका बटणाच्या मदतीनं बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे.
A mobile phone brand is developing a mobile phone with a discoloration rear case, which can adjust the speed of discoloration. Maybe the smart phone will only have one color in the future: discoloration pic.twitter.com/kSg5NSD0tL
यासाठी कंपनी इलेक्ट्रोक्रोमिक ग्लास वापरणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. या फोनमध्ये काचेच्या आता कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनची डिझाईन दाखवत वीबो पोस्टमध्ये एक व्हिडिओ शेअर केला गेला आहे.
या फोनमध्ये आणखीन कोणते वेगळे फीचर्स असणार याची उत्सुकता तर सगळ्यांनाच आहे. पण रंग बदलणारा हा फोन मात्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.