Home /News /technology /

Airtel ला टक्कर देणार Jioचा प्लॅन, दररोज मिळणार 3 GB डेटा आणि फ्री कॉलिंग

Airtel ला टक्कर देणार Jioचा प्लॅन, दररोज मिळणार 3 GB डेटा आणि फ्री कॉलिंग

Reliance Jio 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक खास सुविधा मिळणार आहेत.

    मुंबई, 05 सप्टेंबर: airtel आणि वोडाफोनच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी रिलायन्स jio ने भन्नाट प्लॅन काढला आहे. याशिवाय वर्क फ्रॉम होममध्ये घरातून काम करणाऱ्यांना जास्त GB डेटाची आवश्यकता असते यांचा विचार करूनच Jio ने खास ऑफर आणली आहे. तुम्हाला रोज 3 GB डेटा हवा असेल तर jio चा 349 रुपयांचा 28 दिवसांसाठी खास प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना रोज 3 GB डेटा, जिओ ते इतर नेटवर्कसाठी 1000 मिनिटं आणि जिओ ते जिओ फ्री कॉलिंग मिळणार आहे. याशिवाय रोज 100 SMSची सेवाही उपलब्ध आहे. 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये काय आहे खास Reliance Jio 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक खास सुविधा मिळणार आहेत. 3 GB रोज डेटासह 3 महिन्यांची वैधता मिळणार आहे. जे लोक Work from home करतात त्यांना हा प्लान फायदेशीर ठरणार आहे. 28 दिवसांना 350 रुपयांचा रिचार्ज कऱण्यापेक्षा 999 चा प्लॅन फायदेशीर ठरतो. या शिवाय या प्लॅनमध्ये Jio ते jio ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. इतर नेटवर्कसाठी 3000 मिनिटं आणि 100 SMS दरदिवशी मिळणार आहेत. या प्लॅनची वैधता 84 दिवस असणार आहे. हे वाचा-7000 mAh दमदार बॅटरी! Oppo आणि realme ला टक्कर देणार Samsung M51 अ‍ॅप्सचेही विनामूल्य सबस्क्रिप्शन: रिलायन्स जिओच्या या योजनेत अ‍ॅप्सचा लाभही विनामूल्य उपलब्ध आहे. जिओ आपल्या वापरकर्त्यांना जिओच्या अॅप्सवरून थेट गाणी ऐकता येणार आहे अथवा सिनेमा पाहता येणार आहे. यात जियो सिनेमा, जिओ सावन यासारखे अ‍ॅपलिकेशन्सचा समावेश आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या