जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / विरारमध्ये धरणात तीन मुलं बुडाली, दोघांना वाचवले; वडिलांच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू

विरारमध्ये धरणात तीन मुलं बुडाली, दोघांना वाचवले; वडिलांच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू

धरणात बुडून मुलाचा मृत्यू

धरणात बुडून मुलाचा मृत्यू

मुलगा आणि त्याचे मित्र वडिलांसोबत पापडखिंड धरण परिसरात फिरायला गेले असताना तिघेही बुडाले, स्थानिकांच्या मदतीने मुलाच्या मित्रांना वाचवलं पण मुलाचा मृत्यू झाला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

विजय देसाई, विरार, 17 जुलै : पावसाला सुरुवात झाल्यापासून राज्यात पावसाळी पर्यटन वाढलं आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मुंबईत मार्वे बीचवर पाच जण बुडाल्याची आणि  त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच विरारमध्ये एका मुलाचा बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलंय. विरार पूर्वेकडील फुलपाडा येथील पापडखिंड धरणात पोहण्यासाठी गेलेली तीन मुले बुडाली असून त्यापैकी 2 जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. तर एका 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. असून विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नायगाव पूर्वेकडील चिंचोटी धबधबा येथे तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला असल्याची बातमी ताजी असताना विरार येथील पापडखिंड धरणात तीन मुले बुडाली असल्याची घटना घडली आहे, यातील दोघांना वाचविण्यात यश आले असुन एका मुलाचा मृत्यू झाला आहे. विरार पूर्वेला फुलपाडा येथे महापालिकेचे पापडखिंड धरण आहे. रविवारी सुट्टी असल्याने वसंत बोराडे पत्नी, मुलगा तसेच शेजारील अन्य दोन मुलांसह पापडखिंड धरणावर फिरायला गेले होते. Pune News : पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड, अल्पवयीन टोळक्यांची दहशत रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ओम बोराडे (11) आणि त्याचे दोन मित्र अंश (12) आणि वंश (11) पाण्यात बुडू लागले. स्थानिकांच्या मदतीने वंश आणि अंश यांना वाचविण्यात यश आले. मात्र ओम पाण्यात बुडून मरण पावला. याप्रकरणी रात्री 11 वाजता विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मागील आठवड्यात याच धरणात बुडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता पापडखिंड धरण शेजारी नागरिक फिरायला येत असतात, या धरणा भोवती फिरण्यास व पोहोण्यास बंदी असताना अशा दुर्दैवी घटना घडत असल्याने येथील भागात बंदोबस्त वाढवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: mumbai , virar
  • First Published :
जाहिरात
जाहिरात