पुणे शहरात पुन्हा गाड्यांची तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भिलारेवाडीतील ओम साई निवास येथील वाहनांची तोडफोड करण्यात आली.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी पाच ते सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
धनकवडी येथील चव्हाण नगर परिसरात शांतीनगर वसाहतीत दुचाकीरुन आलेल्या टोळक्यानं लाकडी दांडक्यानं आणि दगडानं वाहनांची तोडफोड केली.