मुंबई, 06 ऑगस्ट : पहाटेपासून मुंबई-ठाणे-नवी मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसााचं थैमान सुरू आहे. सलग दुसऱ्यादिवशी पावसानं झोडपून काढलं आहे. अनेक भागांमध्ये मुसळधारपाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली. रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्या पाण्याखाली गेल्या तर अनेक घरांमध्येही पावसाचं पाणी शिरलं.
पुढे तीन तास मुंबईकरांसाठी महत्त्वाचे आहेत. ताशी 40 ते 50 किमी वेगानं वादळी वाऱ्यासह पुढचे 3 तास पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून कामाशिवाय नागरिकांनी बाहेर पडू नये असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
पुढच्या तीन तासांत कोसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आल्यानं अलर्ट जारी केला आहे. रात्रापासून मुंबईसह उपनगराला पावसानं झोडपून काढल्यानं आधीच सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं आहे.
Intense rainfall along with strong surface winds (40-50 kmph) at isolated places likely over Mumbai during next 3 hours: India Meteorological Department
— ANI (@ANI) August 6, 2020
हे वाचा-मुंबईसह उपनगरांत सुरू असलेल्या मुसळधार पावसानं हाल, घरात धबधबा सुरू, पाहा VIDEO
मुंबईत पावसाचा जोर वाढल्यानं अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. वादळी वाऱ्यासह सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईसह उपनगरात पाऊस सुरू आहे.
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईसह उपनगरांना मोठा बसला. मुंबईसह उपनगरांमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली असून जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालं आहे. बुधवारी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात बुधवारी यंदाच्या मोसमातील 12 तासातील सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामध्ये शहर परिसरात 215.8 मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये 101.9 मिलीमिटर; तर पश्चिम उपनगरांमध्ये 76.03 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Mumbai rain, Weather updates