प्रमोद पाटील(मुंबई) : नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन शौचालयात पाणी पुरी ठेवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाशी रेल्वे स्थानकाच्या बाहेर अनेक पाणी पुरी आणि इतर खाद्य पदार्थ विकणारे विक्रेते अनधिकृतपणे बसतात. मात्र आपला माल ठेवण्यास तिथे कोणतीही सोय नसल्याने हे खाद्य विक्रेते तेथील शौचालयाचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांकडून योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
हे ही वाचा : ओळख, मैत्री, प्रेम, लिव्ह-इन, शरीरसंबंध अन् गर्भवती झाल्यावर मात्र…, अमरावतीच्या तरुणीसोबत काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन शौचालयात पाणी पुरी ठेवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाशी रेल्वे स्थानकाच्या बाहेर अनेक पाणी पुरी आणि इतर खाद्य पदार्थ विकणारे विक्रेते अनधिकृतपणे बसतात. मात्र आपला माल ठेवण्यास तिथे कोणतीही सोय नसल्याने हे खाद्य विक्रेते तेथील शौचालयाचा वापर करत असल्याची माहिती समोर आली आहे.
नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशनवर शौचालयात पाणीपुरी ठेवली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे pic.twitter.com/g2CwCW5X22
— News18Lokmat (@News18lokmat) December 23, 2022
याचबरोबर जास्तीचा माल शौचालयात ठेवला जात असल्याची माहिती मिळाली आहे. दुकान बंद केल्यावरही माल सोबत न नेता तिथेच ठेवत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान महानगरपालिकेची अतिक्रमण विभागाची गाडी आली की हे विक्रेते आपला माल इथेच लपवतात तर गाडी गेल्यावर पुन्हा जाग्यावर जाऊन विक्रीला सुरुवात करतात.
हे ही वाचा : घरात घुसून 15 जणांचं महिला सरपंचासोबत धक्कादायक कृत्य, बुलडाण्याला हादरवणारी घटना
विशेष म्हणजे पालिका फक्त कारवाईचा फार्स दाखवते. मात्र असे अनेक अनधिकृत विक्रेते कायम स्वरुपी इथेच ठाण मांडून बसलेले असतात. तर माल ठेवण्यासाठी येथील शौचालयाचा नेहमीच वापर करतात. आणि गजबजलेल्या वाशी स्टेशनवरून दिवसभरात हजारो प्रवाशी प्रवास करताना त्यांना हीच पाणीपुरी खावी लागते.