मुंबई, 12 डिसेंबर : लगीन घाई हा आपल्याकडे जिव्हाळाचा विषय आहे. पण जो पर्यंत लग्न वार्ता इतरांपर्यंत पोहचत नाही तो पर्यंत लग्नाच्या सुरुवातीला सुरुवात झाली असे म्हणता येत नाही. त्याकरिता महत्वाची ठरते ती लग्न पत्रिका. लग्नपत्रिकेच्या माध्यमातून नातेवाईकांना आमंत्रित केलं जातं. याच लग्नपत्रिकेसोबत आमंत्रित करताना तुम्ही वेगवेगळे गिफ्ट नातेवाईकांना देवू शकता. मुंबई च्या गायवाडी येथील मार्केटमध्ये हे गिफ्ट उपलब्ध असून या मध्ये कोणता ट्रेन्ड सुरु आहे जाणून घेऊया. डिजिटल युगातही लग्नपत्रिकाचा वेगवेगळा ट्रेन्ड डिजिटल युगातही लग्नपत्रिकेचे क्रेझ मात्र कमी झालेले दिसत नाहीये. कागदी पत्रिकेला मागणी आहे. सध्या लग्नसराईमुळे पत्रिका वाटपाचे जोरदार काम सुरू आहे. पारंपरिक पद्धतीने लग्नपत्रिका कमी प्रमाणात छापल्या जात असून बॉक्स लग्नपत्रिकांचा ट्रेन्ड वाढला आहे. यात पत्रिकेवर मोजकीच नावं, वधूवराचा फोटो, सिम्पल फॉन्ट, आणि लग्नपत्रिकेसोबत एक लहानसं गिफ्ट देण्याचा ट्रेन्ड या वर्षी पाहायला मिळतोय.
बांगडी, बाजूबंद, हार आणि बरंच काही… मोत्याच्या दागिन्यांचा थाट अन् लग्नात तुमचीच हवा
गिफ्ट मध्ये कोणत्या वस्तू दिल्या जात आहेत? आमंत्रण पत्रिकेसोबत गिफ्ट म्हणून मिठाई, ड्रायफ्रुट्स, होम डेकोरेटीव वस्तू, स्पिरिच्युअल वस्तू, देवाची मूर्ती, स्टोन्स, इत्यांदी वस्तू देण्याचा ट्रेन्ड आहे. काय किंमती आहेत? कागदाची किंमत वाढल्यामुळे लग्नपत्रिकाची किंमत वाढलेली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा लग्नपत्रिकांच्या दरात 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. साध्या पत्रिका 15 रुपये प्रति नग ते 200 रुपये प्रति नग पर्यंत उपलब्ध आहेत. तर विथ गिफ्ट 150 रुपये ते 600 रुपयांपर्यंत प्रति नग प्रमाणे आमंत्रणपत्रिका उपलब्ध आहेत.
लग्नात साडीवर मॅचिंग ब्लाऊज हवंच! मुंबईत हा ट्रेन्ड आहे सुपरहिट, पाहा Videoआम्ही लग्न पत्रिका हव्या त्या पद्धतीची बनवून देतो. तसंच ग्राहकांना डार्क रंगात आमंत्रणपत्रिका बनवायच्या असतात. काही खास जणांना आमंत्रित करण्यासाठी लोकं आमंत्रणपत्रिकेसोबत गिफ्टचा पर्याय सुद्धा निवडतात, असं ग्रँट रोड जवळील गायवाडी येथे असलेल्या पत्रिका मार्केटमधील विक्रेत्यांनी माहिती दिली.
पूर्ण पत्ता
कल्याण बिल्डिंग, 168, खाडिलकर रोड, कांदावाडी, नं.1, गिरगाव, मुंबई, महाराष्ट्र
संपर्क क्रमांक - 9930378955