मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

लग्नात साडीवर मॅचिंग ब्लाऊज हवंच! मुंबईत हा ट्रेन्ड आहे सुपरहिट, पाहा Video

लग्नात साडीवर मॅचिंग ब्लाऊज हवंच! मुंबईत हा ट्रेन्ड आहे सुपरहिट, पाहा Video

X
wedding

wedding Shopping : तुम्हाला हवं ते ब्लाऊज पीस मुंबई मधील दादरच्या बाजारपेठ मध्ये मिळेल.

wedding Shopping : तुम्हाला हवं ते ब्लाऊज पीस मुंबई मधील दादरच्या बाजारपेठ मध्ये मिळेल.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 09 डिसेंबर : लग्नात रंगीबेरंगी साड्यांची क्रेझ महिलावर्गात भरपूर बघायला मिळते. यासाठी साड्या मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात. मात्र, साडी खरेदी केल्यानंतर त्यासोबत येणार ब्लाऊज पीस बऱ्याच वेळा आवडत नाही. ब्लाऊज बनवताना बऱ्याच वेळा खराब होतं किंवा अजून काही दुसरी आयडिया आली तर त्यासाठी मॅचिंग किंवा कॉट्रस्ट रंगाचं ब्लाऊज शिवायचं असं सुचतं मग त्यासाठी ब्लाऊज पीस पाहिजे! तुम्हाला हवं ते ब्लाऊज पीस मुंबई मधील दादरच्या बाजारपेठ मध्ये मिळेल. तसंच लग्नसराईमुळे कोणत्या ब्लाऊज पीस ट्रेन्ड मध्ये आहे ते पण पाहुयात.

कोणते ब्लाऊज पीस विकले जाताहेत?

सिल्क, वेलवेट, कच्छी वर्क, कॉटन, जोर्जेट, बंगाली सिल्क, पैठणी पॅटर्न, अक्षरा पॅटर्न, इत्यादी प्रकारचे ब्लाऊज पीस बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लग्नसमारंभात सहसा भरीव वर्क आणि जरीदार साड्या नेसल्या जातात. त्यामुळे त्या साड्यांना सूट होईल असे ब्लाऊज पीस महिला निवडतात.

Wedding Season : लग्नात रुखवत का दिलं जातं माहिती आहे ? पाहा Video

कोणत्या ब्लाऊज पीसचा ट्रेन्ड सुरू आहे?

वेलवेट आणि कच्छी वर्कचे ब्लाऊज पीस सध्या बाजारात जास्त प्रमाणात विकले जात आहेत. वेलवेटचे ब्लाऊज पीस निवडन्यामागचे कारण म्हणजे हे ब्लाऊज विविध साड्यांवर सूट होते. तसंच कच्छी वर्कचे ब्लाऊज रात्रीच्या कार्यक्रमांमध्ये अर्थात संगीत, मेहंदीच्या कार्यक्रमांमध्ये उठून दिसते. म्हणून हे ब्लाऊज पीस जास्त निवडले जातात. तसंच पैठणी पॅटर्न ब्लाऊज पीस प्लेन साडीवर नेसण्याचा ट्रेन्ड यावेळी पाहायला मिळतोय.

ब्लाऊज पीस काय भावाने विकले जाताहेत?

दादरच्या बाजारात बंगलोर, कच्छ, गुजरात,ई. ठिकाणावरून ब्लाऊज पीस मागवले जातात. 50 रुपये मिटर ते 4000 रुपये मिटर पर्यंतचे ब्लाऊज पीस बाजारात मिळतात. वेलवेटचे ब्लाऊज पीस 400 रुपये प्रति मिटर पासून विक्री होते. कच्छी वर्कचे ब्लाऊज पीस 550 रुपये प्रतिमिटर प्रमाणे विकले जातात. प्रत्येक ब्लाऊज पीसच्या किंमती वेगवेगळ्या आहेत.

लग्नात मिरवायला मोत्यांचे दागिने हवेच! पाहा कोणते प्रकार आहेत बाजारात उपलब्ध, Video

लग्नसराईमुळे महिलांची खरेदी वाढली आहे. कापड बाजार महागला असला तरीसुद्धा खरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांचा आहे, असं दादर येथील अशोक स्टोरचे मालक दीपक शहा यांनी सांगितलं.

पूर्ण पत्ता 

362, न. चिं. केळकर मार्ग, दादर पश्चिम, दादर, मुंबई, महाराष्ट्र 400028

First published:

Tags: Lifestyle, Local18, Mumbai, Shopping, Wedding