जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Vande Bharat : मुंबई-गोवा वंदे भारत उद्यापासून सुरू, पाहा किती आहे गोव्यापर्यंतचं तिकीट

Vande Bharat : मुंबई-गोवा वंदे भारत उद्यापासून सुरू, पाहा किती आहे गोव्यापर्यंतचं तिकीट

Vande Bharat : मुंबई-गोवा वंदे भारत उद्यापासून सुरू, पाहा किती आहे गोव्यापर्यंतचं तिकीट

Vande Bharat Mumbai To Goa : मुंबई-गोवा वंदे-भारत एक्स्प्रेसबाबतच्या तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही देणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 जून : भारतीय रेल्वेतील सर्वात आधुनिक अशा वंदे भारत एक्स्प्रेसमधून कोकणातील नैसर्गिक सौंदर्य अनुभवण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. मुंबई ते मडगाव दरम्यानच्या वंदे भारत-एक्स प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (27 जून) रोजी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यापूर्वी ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर या रेल्वेचं उद्घाटन पुढं ढकलण्यात आलं होतं. काय आहे मार्ग? मुंबई-गोवा वंदे भारत-एक्स्प्रेस ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटेल ती गोव्यातील मडगाव स्टेशनपर्यंत धावणार आहे. या ट्रेनला आठ डब्बे असून  586 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या मार्गावरील अन्य फास्ट रेल्वेपेक्षा हा कालावधी 3- 4 तास कमी आहे, असा दावा रेल्वे प्रशासनानं केलाय आठवड्यातील सहा दिवस (शुक्रवारसोडून) ही रेल्वे धावणार आहे.  ‘वंदे भारत’ मुळे कमी कालावधीत कोकणात पोहचता येणार आहे. त्यामुळे तेथील पर्यटनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे.

News18लोकमत
News18लोकमत

वंदे भारतचं वेळापत्रक नॉन मान्सून आणि मान्सून या दोन कालावधीसाठी वंदे भारत एक्स्प्रेसचं वेगळं वेळापत्रक आहे. नॉन मान्सून वेळापत्रक : मुंबईतील सीएसएमटीहून पहाटे 5 वाजून 35 मिनिटांनी ही रेल्वे सुटेल आणि दुपारी 1.15 मिनिटांनी मडगावला पोहचेल. तर मडगावहून दुपारी 2.35 मिनिटांनी ही गाडी सुटणार असून रात्री 10.25 वाजता सीएसएमटीला पोहचेल. मान्सून वेळापत्रक : दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे 05.25 वाजता सीएसएमटी मुंबईहून निघेल आणि  मडगावला दुपारी 3.30 वाजता पोहोचेल. तर मडगावहून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी 12.20 वाजता सुटेल आणि 22.25 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल. Mumbai Lifeline लोकलची जागा लवकरच वंदे भारत मेट्रो घेणार? किती आहे भाडं? वंदे भारत ट्रेनचे रेल्वे भाडे  हे वेगवेगळे असून  सी डब्यांसाठी 1,100 रुपये ते 1,600 रुपये एवढं भाडं आकारण्यात येणार आहे.  तर एक्झिक्यूटिव्ह क्लास श्रेणी म्हणजेच प्रथम श्रेणी डब्यासाठी 2000 रुपये ते 2800 रुपये एवढे भाडे आकारण्यात येईल अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिलीय. कुठे असेल स्टॉप? ही ट्रेन दादर,  ठाणे,  पनवेल , रोहा , खेड,  रत्नागिरी,  कणकवली आणि थिविम येथे थांबणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात