मुंबई, 9 जानेवारी : गेल्या 3 वर्षात कोरोना महामारीमुळे सर्वच उद्योगांचं गणित बिघडलंय. हॉटेल उद्योगाचं तर कंबरडचं कोरोना कालावधीमध्ये मोडलं. हे नुकसान भरुन काढण्यासाठी बहुतेक हॉटेलचालक तसंच स्टॉल मालकांनी खाद्यपदार्थाचे दर वाढवले आहेत. वाढत्या दराचा फटका सर्वसामान्यांना बसतोय. त्याचं बजेट यामुळे कोलमडलंय. महागाईच्या जमान्यातही सर्वसामान्यांच्या खिशाचा विचार मुंबईतील एका तरूणानं केलाय. तो आजही कुर्लामध्ये फक्त 8 रूपयांमध्ये वडा-पाव देतोय. कुठे मिळतो वडा-पाव? मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात स्टेशनच्या अगदी जवळ नशेमन हॉटेलच्या बाजूला असलेल्या रायगड वडापाव येथे फक्त आठ रूपयात वडापाव मिळतो. पनेवल, खारघर नवीमुंबई येथे राहणारे भोलेनाथ पाटील यांचं पदवी शिक्षण पूर्ण झालं आहे. मात्र त्यानंतर काही तरी वेगळं करण्याची इच्छा मनात होती. भोलेनाथ पाटील यांनी सध्याची परिस्थितीची जाण ठेवून फक्त 8 रुपयांमध्ये वडपाव विकण्यास सुरूवात केलीय. हा पॉकेट फ्रेंडली वडा-पाव खाण्यासाठी सर्वजण गर्दी करत आहेत. विद्यार्थ्यांना फक्त 5 रुपयांमध्ये मिळतो वडापाव! विश्वास बसत नसेल तर पाहा Video ‘वडापाव हा मुंबईकरांचा हक्काचा पदार्थ आहे. कोरोनामुळे अनेकांचे जेवणाचे वांदे झालेत. त्या परिस्थितीमध्ये सर्वांना मदत व्हावी म्हणून आम्ही 8 रुपयात वडापाव देण्याचं ठरवलं. इतर ठिकाणी वडापावची किंमत 15 पेक्षा जास्त आहे. त्याच किंमतीमध्ये आमच्याकडं दोन वडापव मिळतात. या वडापावचा आकारही इतर वडापाव इतकाच आहे. त्याचबरोबर आम्ही मिसळपाव देखील 25 रुपयांना देतो,’ अशी माहिती भोलेाथ यांची बहिण संज्योती गायकवाड यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात कुणीही उपाशी राहू म्हणून रायगड वडापाव हे नाव दिल्याचं त्यांनी सांगितलं. आमच्या मुंबईत 9 ब्रँच आहेत. सर्व ठिकाणी 8 रुपयांमध्ये हा वडापाव मिळतो. सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत आमची ब्रँच सुरू असते. ग्राहकांचा त्याला चांगला प्रतिसाद आहे,’ असं गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
गुगल मॅपवरून साभार