नालासोपारा, 03 जानेवारी : वजन कमी करण्यासाठी किंवा शरीरयष्टी बनवण्यासाठी जिममध्ये जाण्याचा सल्ला दिला जात असतो. चांगली शरीरयष्टी बनवण्यासाठी ट्रेनर चांगले प्रशिक्षण देत असतो. पण, नालासोपऱ्यामध्ये एका जिम ट्रेनरचा श्वास कोंडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिम भागात ही घटना घडली आहे. देविदास विनायक जाधव (वय ३५) असं मृत ट्रेनरचं नाव आहे. यशवंत गौरव येथील शालिभद्र यश अपार्टमेंटमध्ये ते राहत होते. आज सकाळी अचानक देविदास जाधव यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. (29 वर्षीय डॉक्टर पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार; विरोध केल्याने थेट.. बीडमधील घटना) जाधव यांना नेमकं काय होतंय, हे कुणालाच कळेना. त्यामुळे तातडीने घरच्यांनी धाव घेतील. जाधव यांना बेशुद्धावस्थेत घरच्यांनी तसेच इमारतीमधील लोकांनी नालासोपारा येथील रिद्धी विनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. वाचा - वर्षभरापूर्वी लग्न, सासरचा जाच अन् पतीचं पत्नीसोबत भयानक कांड; जालन्यातील घटना मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. याबाबत नालासोपारा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत विनायक जाधव हे एक जिम ट्रेनर म्हणून काम करत होते. नालासोपारा पश्चिम नाळा डिसिल्वानगर येथील ‘द फिटनेस कार्डेस’ या जिम मध्ये तरुणांना व्यायामाचे धडे देत होते. एका जिम ट्रेनरचा असा अकाली दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.