• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • EXCLUSIVE: उद्धव ठाकरेंबद्दल शरद पवारांनी पहिल्यांदाच बोलून दाखवली नाराजी, म्हणाले...

EXCLUSIVE: उद्धव ठाकरेंबद्दल शरद पवारांनी पहिल्यांदाच बोलून दाखवली नाराजी, म्हणाले...

'अजित पवार यांच्याकडे फायनान्स आणि प्लॅनिंग जबादारी आहे, त्यांची फिल्डपेक्षा मंत्रालयात अधिक गरज आहे'

  • Share this:
मुंबई, 28 जुलै : 'गाडीचे स्टेअरिंग माझ्याकडेच आहे' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. आता खुद्ध राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'महाविकास आघाडी सरकारचा रिमोट माझ्याकडे नाही, काही नेते अस्वस्थ आहे' असं म्हणून गुगली टाकली आहे. तसंच, उद्धव ठाकरे यांच्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली आहे. न्यूज18 लोकमताला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत असताना शरद पवार यांनी भाजप नेत्यांवर सडकून टीका केली. तसंच महाविकास आघाडीबद्दल भाष्यही केले. 'सध्या नवीन पर्याय नसल्याने हे सरकार 5 वर्ष चालणार आहे. पण भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच अस्वस्थ आहेत. त्यांना सरकार पाडण्याची घाई आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता निवडणूक कोणालाही नको आहे' असं म्हणत पवारांना फडणवीसांना टोला लगावला आहे. 'धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री घेत आहे. प्रशासन घेत नाही. विशेषतः सर्व सहकाऱ्यांना मुख्यमंत्री विश्वासात घेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम चांगले आहे. त्यांनी एका ठिकाणी बसून परिस्थिती सांभाळावी यात कोणताही वाद नाही. पण थोडं फिरलंही पाहिजे' असंही शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून मुख्यमंत्री मातोश्रीवरच असता अशी टीका होत आहे. त्यावर पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 'उद्धव ठाकरे यांच्या सरकारला चिंता नाही. ते सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम करत आहे', असं कौतुकही पवारांनी केले. ...तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बाहेर पडू देणार नाही, मराठा क्रांतीचा इशारा तर, दुसरीकडे 'अजित पवार यांच्याकडे फायनान्स आणि प्लॅनिंग जबाबदारी आहे, त्यांची फिल्डपेक्षा मंत्रालयात अधिक गरज आहे. अनिल देशमुख, राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे यांना फिल्डवर काम करण्याची  जबाबदारी दिली आहे, असंही सांगून पवारांनी अजितदादांना एकाप्रकारे मंत्रालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे. त्याचबरोबर, अजित पवार, जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षची जबाबदारी आहे', असंही पवारांनी स्पष्ट केले. 'महाविकास आघाडी सरकारचा रिमोट कंट्रोल माझ्या हातात नाही. आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. मागील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या एकांगी कारभारामुळे संधी जाणवली होती.  या परिस्थितीत आम्ही सर्व चाचपडून पाहिलं आणि याचे नेतृत्व शिवसेनेकडे जावं यासाठी एकमत झाले होते', असंही पवारांनी सांगितलं. 'आज काँग्रेस तसंच राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. आता तीन पक्षांचे आघाडी सरकार आले तर कुठल्याही आघाडीच्या सरकारमध्ये  अशी नाराजी आणि अस्वस्था असणारच आहे. राज्य चालवताना काही इच्छा असतात, त्या आघाडी सरकारमध्ये सर्व इच्छा पूर्ण होतात असे नाही म्हणून काही जण अस्वस्थ असतात' असं सांगत पवारांनी काही मंत्री अस्वस्थ असल्याची कबुली दिली आहे. 'एक दूजे के लिये' म्हणत राहत होते एकत्र; पण घडले असे की, सारिकाचा चिरला गळा! राम मंदिराबाबत कुठलाही वाद नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतल्यानंतर वाद मिटलेला आहे. राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला जाण्याचा निर्णय मी घेतला नाही. निमंत्रण मिळाले तरी मी जाणार नाही, कारण कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर असून राज्याच्या हिताची जबाबदारी मोठी आहे, असंही पवारांनी स्पष्टपणे सांगितले आहे. भाजपला लोकशाही विचार पचत नाही, असं दिसतं आहे. म्हणून आपल्या विचारापेक्षा दुसरं सरकार नकोच हे योग्य नाही. पंतप्रधान  मोदी यांना सर्वांना सोबत घेऊन जावस वाटत, पण त्यांचे सहकारी त्यांना असं करू देत नाही, अशी टीकाही पवारांनी अमित शहा यांचे नाव न घेता केली. लोकशाही मध्ये एकाच व्यक्तीसोबत कायम वलय नसतो.  राहुल गांधी यांना टार्गेट करण्यात आलं, त्याच्यावर सतत टीका केली गेली. ते नेतृत्व परत करतील का? याविषयी माहिती नाही. पण, चीन अजूनही हत्यारांचा वापर करत नाही, हा करार मी संरक्षण मंत्री असताना झालं. राहुल गांधींचं चीन विषयी आरोप त्याच मतं आहेत, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. चीन बरोबरच संघर्ष राजकीय पद्धतीने  सोडवला जावा, असंही पवार म्हणाले.
Published by:sachin Salve
First published: