जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / "काही जुने व्हायरस परत आलेत, त्यांचा बंदोबस्त करायचाय" उद्धव ठाकरेंचा राणेंना अप्रत्यक्ष टोला

"काही जुने व्हायरस परत आलेत, त्यांचा बंदोबस्त करायचाय" उद्धव ठाकरेंचा राणेंना अप्रत्यक्ष टोला

या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे

या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात भाषण करताना अप्रत्यक्षरित्या नारायण राणेंवर निशाणा साधला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 ऑगस्ट : शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष काही कमी होताना दिसत नाहीये. शिवसेनेकडून राणेंवर टीका होत असताना नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार सुरू आहे. याच दरम्यान आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “पोस्ट कोविड हा जो प्रकार आहे की, आहे ते टिकवलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे चांगल्या गोष्टी वाढवायला हव्यात. दुर्दैवाने काय होतं, आजचं जे वातावरण आहे, थोडं सावधानतेने मी पाऊल टाकत आहे. अजूनही थोडे दिवस थांबायला हवं, कोरोनाचं संकट खरचं गेलंय का? अजून पूर्ण गेलेलं नाहीये. थोडंस आहे. काही-काही तर जुने व्हायरस पण परत आले आहेत. आणि जुने व्हायरस सुद्धा कारण नसताना साईड इफेक्टस आणत आहेत. तर त्या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे या व्हायरसचा बंदोबस्त करायचा आहे.” “राणेंनी स्वत:ला महान समजणे बंद केले तर त्यांच्या आयुष्यातील समस्या औषधांशिवाय बऱ्या होतील” शिवसेनेची टीका पर्यटन हे असं क्षेत्र आहे, सर्वांना फिरण्यासाठी आवडतं. काहीजणांचं राजकीय पर्यटन असंत इथून तिथं आणि तिथून इथे. काहीजण प्रवासी असतात ते वेगवेगळी ठिकाणे पाहत असतात. मधल्या काळात केंद्र सरकारने एक व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली होती त्यात त्यांनी सांगितलं होतं, सावधनता बाळगा. पर्यटन स्थळावर इतकी गर्दी होत आहे की, पुन्हा हे संकट येऊ शकतं असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवर निशाणा साधला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात