Home /News /mumbai /

उद्धव ठाकरेंनी एकदा नाही दोनवेळा केला फडणवीसांना फोन, पुन्हा युती की खुर्ची वाचवणार?

उद्धव ठाकरेंनी एकदा नाही दोनवेळा केला फडणवीसांना फोन, पुन्हा युती की खुर्ची वाचवणार?

विशेष म्हणजे, असाच प्रकार २०१९ झाला होता. भाजपकडे १०६ आमदारांचे संख्याबळ होते. पण उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन कऱण्यास नकार दिला होता.

विशेष म्हणजे, असाच प्रकार २०१९ झाला होता. भाजपकडे १०६ आमदारांचे संख्याबळ होते. पण उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन कऱण्यास नकार दिला होता.

विशेष म्हणजे, असाच प्रकार २०१९ झाला होता. भाजपकडे १०६ आमदारांचे संख्याबळ होते. पण उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन कऱण्यास नकार दिला होता.

    मुंबई, 28 जून : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर अस्थिरतेचे संकट आले आहे. सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीभाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांना एकदा नाहीतर दोनदा फोन केल्याची माहिती समोर आली आहे. पण, फडणवीस यांनी फोन उचलला नाही. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदारांसह 21 जून रोजी सुरतला दाखल झाले होते. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली होती. शिवसेनेनं शिंदेंना परत बोलावण्यासाठी बरेच प्रयत्न केले. एवढच नाहीतर मिलिंद नार्वेकर यांनाही सुरतमध्ये पाठवले होते. पण, एकनाथ शिंदेंनी काही ऐकलं नाही. शिंदेंनी फक्त महाविकास आघाडीतून बाहेर पडा, अशी मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवरून याच्या पाठीमागे भाजप असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे २१ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याची माहिती समोर आली. पण फडणवीस यांनी फोन उचलला नाही. उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा फोन केला पण तरीही फडणवीस यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर मुख्यमत्र्यांनी त्यांना मेसेज केला पण त्यात मजकूर काय हे मात्र कळू शकले नाही. विशेष म्हणजे, असाच प्रकार २०१९ झाला होता. भाजपकडे १०६ आमदारांचे संख्याबळ होते. पण उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन कऱण्यास नकार दिला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधण्यासाठी बरेचदा फोन केले होते. पण त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी फोन उचलले नव्हते. आता तीच वेळ उद्धव ठाकरेंवर आली आहे. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांशी फोनवर संवाद साधण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, मागील अडीच वर्षांमध्ये फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. फडणवीस यांनी एक एक आरोप, घोटाळे बाहेर काढत ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. एवढंच नाहीतर शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना वनमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, नवाब मलिक यांना जेलची हवा खावी लागली. अलीकडेच राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकीतही फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला शह दिला. त्यानंतर आता हे एकनाथ शिंदे यांचे बंड समोर आले आहे. त्यामुळे आता राज्यात मोठा सत्तासंघर्षाचा पेच निर्माण झाला आहे. महाविकास आघाडी सरकार एकीकडे कायदेशीर मार्गाने सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे संवादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या