मुंबई, 3 मे : आपल्या पत्नीचे दुसऱ्या सोबत प्रेम संबंध असल्याच्या समजुतीतून मालाडमध्ये पतीने पत्नीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. मालाड येथील क्रांतीनगर या विभागात महेश सोनी हा आपली पत्नी पूनम आणि मुलगा शिवा यांच्या सोबत राहतो. आपल्या पत्नीचे कोणाशी तरी अवैध संबंध असल्याची शंका महेशला होती. पूनम ही सतत कोणाशी तरी फोनवर बोलत असायची. तसेच आपल्या पतीला न सांगता खूप वेळ बाहेर जात असे, त्यामुळे महेशचे तिच्या सोबत नेहमी भांडण व्हायचे. 1 मे ला 12 वाजेेेच्या दरम्यान दुपारी महेश आणि पूनम यांचे जोरदार भांडण झाले. त्यात महेशने आपल्या गावाकडून आणलेला चाकू काढून पुनमच्या गेल्यावर मानेवर छातीवर पोटावर सपासप असे 10 वार केले. त्यात ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. या भांडणाचा शेजाऱ्यांनी आवाज ऐकून महेश याच्या मुलाला फोन केला तो घरी आल्यावर दरवाजा ठोठावला असता वडिलांनी दार उघडले. हे ही वाचा- पत्नी रोज रात्री उशिरा यायची, पत्नीने चाकूने 10 वार करून संपवलं, मुंबईतील घटना घरात आई जखमी अवस्थेत पडली होती. ताबडतोब तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन तासातच आरोपी महेश याला अटक केली, अशी माहिती कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वसंत वेले यांनी दिली आहे. हत्या केल्यानंतर महेश घाबरला आणि तो घरातच बसून होता. त्यावेळी त्याच्या मनात वेगवेगळे विचार येत होते आणि तो पळून जाण्याचा तयारीत होता. मुलगा आल्यानंतर त्याने आईला शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यानंतर महेश घाबरून घरी पळून गेला होता. पोलिसांना शेजाऱ्यांनी सांगितल्यावर, महेशवर संशय होता. पण महेश पळून गेल्याने पोलिसांनी 3 अधिकाऱ्यांचे पथक स्थापन केले आणि मुलाला विश्वासात घेऊन महेश कुठे जाऊ शकतो याची माहिती घेतली. त्या माहितीतून पोलिसांनी मालाड येथे एका ठिकाणी जाऊन महेश याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी ही प्रक्रिया लवकर केल्याने आरोपी महेश पळून जाऊ शकला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.